Join us  

टाकीत न उतरता फक्त ५ मिनिटांत टाकी स्वच्छ करा; सोप्या ट्रिक्स वापरा, वेळ-मेहनत दोन्ही वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 2:23 PM

How to Clean Water Tank at Home : वारंवार एकाच टाकीत पाणी भरल्यामुळे खाली माती, घाण साचून मोठ्या  प्रमाणात गाळ तयार होतो.

पाण्याची टाकी प्रत्येकाच्याच घरी असते. पाण्याची टाकी रोजच्या वापरातील एक अशी वस्तू आहे जी स्वच्छ असणं फार गरजेचं असतं. (Cleaning Hacks) टाकीतलं पाणी स्वच्छ करण्याासाठी टाकीत शिरून साफ करावी लागते किंवा टाकी स्वच्छ करणाऱ्या कामगारांना बोलवावे लागते हे टाळण्यासाठी तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने टाकी स्वच्छ करू शकतात. ( How to Clean Water Tank at Home)

वारंवार एकाच टाकीत पाणी भरल्यामुळे खाली माती, घाण साचून मोठ्या  प्रमाणात गाळ तयार होतो. हा गाळ वेळीच स्वच्छ केला नाही तर छोट्या छोट्या अळ्या, किडे तयार होतात. हे किडे आणि अळ्या काढून टाकण्याासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काम करण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी काही  उपाय आहेत ते पाहूया

१) सगळ्यात आधी वापरात नसलेली प्लास्टीकची बॉटल घ्या. ही बॉटल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरूवातीच्या बाजूने कापून घ्या. वरच्या भागाला लहान लहान कट्समध्ये विभागा. 

२)  प्लास्टीकच्या पाईपला पीव्हिसी पाईप जोडून  घ्या.  पीव्हीसी पाईपला  बॉटल लावून चिकटपट्टीने पॅक करा. जेणेकरून टाकीत घातलं की निसटणार नाही. टाकीचे एक टोक टाकीत घाला आणि दुसरं बाहेर काढा. ज्यातून खराब पाणी बाहेर निघून जाईल. त्यानंतर मॉप किंवा मोठ्या  ब्रशच्या साहाय्याने टाकी साफ करून घ्या.

रोज चालता तरी पोट-मांड्या जाडजूड? किती पाऊल आणि कधी चालावं याचं सोपं गणित, मेंटेन व्हाल

तुरटी

तुरटी पाणी साफ करण्यासाठी उत्तम ठरते. एक बादली पाण्यात तुरटी मिसळून थोड्या वेळासाठी असंच ठेवून द्या.  तुरटीच्या वापराने टाकतील घटक खाली बसतील आणि टाकी स्वच्छ करण्यासाठी त्रासही होणार नाही. 

केस रोज गळतात-वाढच नाहीये? किचनमधल्या ३ वस्तू केसांना लावा, १५ दिवसांत वाढतील केस

हायड्रोजन पेरोक्साईड

हायड्रोजन पेरोक्साईड असं केमिकल आहे. ज्यामुळे टाकी स्वच्छ राहण्यास मदत होईल.  हे द्रावण वापरल्यानंतर याचा वापर अजिबात करू नका. टाकी पूर्ण  क्लिन केल्यानंतर त्यात परत पाणी भरा. १५ ते ३० मिनिटांनी ५०० मिलीलिटर हायड्रोजन पेरोक्साईड मिसळा.  

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी