Lokmat Sakhi >Social Viral > काळ्याकुट्ट-मळलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्या धुण्याची पाहा सोपी पद्धत, १० मिनिटांत खुर्च्या दिसतील नव्यासारख्या चकचकीत...

काळ्याकुट्ट-मळलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्या धुण्याची पाहा सोपी पद्धत, १० मिनिटांत खुर्च्या दिसतील नव्यासारख्या चकचकीत...

How To Clean White Plastic Chairs Before Diwali : Effective Tips to Clean Your White Plastic Chairs : The Best Way to Make White Plastic Chairs Look New Again : How To Clean Plastic Chairs At Home Quick & Easy Cleaning Hacks : दिवाळीनिमित्त घरातील प्लॅस्टिकच्या पांढऱ्याशुभ्र खुर्च्या स्वच्छ करण्याचे ४ उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 06:37 PM2024-10-22T18:37:35+5:302024-10-22T18:52:12+5:30

How To Clean White Plastic Chairs Before Diwali : Effective Tips to Clean Your White Plastic Chairs : The Best Way to Make White Plastic Chairs Look New Again : How To Clean Plastic Chairs At Home Quick & Easy Cleaning Hacks : दिवाळीनिमित्त घरातील प्लॅस्टिकच्या पांढऱ्याशुभ्र खुर्च्या स्वच्छ करण्याचे ४ उपाय...

How To Clean White Plastic Chairs Before Diwali Effective Tips to Clean Your White Plastic Chairs How To Clean Plastic Chairs At Home Quick & Easy Cleaning Hacks | काळ्याकुट्ट-मळलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्या धुण्याची पाहा सोपी पद्धत, १० मिनिटांत खुर्च्या दिसतील नव्यासारख्या चकचकीत...

काळ्याकुट्ट-मळलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्या धुण्याची पाहा सोपी पद्धत, १० मिनिटांत खुर्च्या दिसतील नव्यासारख्या चकचकीत...

दिवाळीची (Diwali 2024) तयारी आता सगळ्याच घरात अगदी जोरदार सुरु असेल. दिवाळीचा फराळ तयार करणे आणि संपूर्ण घराची साफसफाई करणे ही दोन मुख्य काम दिवाळीआधी केली जातात. वर्षभर घराची वरवर स्वच्छता केली तरी दिवाळीत मात्र आपण घराचा एक एक कोपरांकोपरा स्वच्छ करतो. घरातील साफसफाई करताना आपण घरातल्या जुन्या वस्तू काढून टाकणे, जळमटं, यासोबतच बेड - सोफा, खुर्च्या हे देखील स्वच्छ करतो. दररोज वापरल्या जाणाऱ्या खुर्च्या, बेड, सोफा यांवर आपल्या नकळतपणे फार धूळ बसते. ही धूळ जर वेळीच स्वच्छ केली नाही तर त्याचा चिकट थर तयार होतो, असा चिकट थर स्वच्छ करणे कठीण होते. तसेच या धूळ आणि साचलेल्या चिकट थरांमुळे आपल्या खुर्च्या, सोफा, बेड कालांतराने मळकट दिसू लागतात( The Best Way to Make White Plastic Chairs Look New Again).

ऐन दिवाळीत जर संपूर्ण घर स्वच्छ केले आणि बेड - सोफा, खुर्च्या स्वच्छ केल्या नाहीत तर ज्या फारच जुन्या आणि खराब दिसू लागतात. आपल्या सगळ्यांच्या घरात बसण्यासाठी प्लॅस्टिकच्या पांढऱ्याशुभ्र खुर्च्या (How To Clean Plastic Chairs At Home Quick & Easy Cleaning Hacks) असतात, या खुर्च्यांचा रंगच पांढरा असल्याने त्या कितीही स्वच्छ केल्या तरीही लगेच खराब होतात. एरवी आपण या खुर्च्यांची वरवर सफाई केली तरीही दिवाळीत त्या स्वच्छ करण्यासाठी आणि पुन्हा नव्यासारख्या दिसण्यासाठी काही सोप्या उपायांचा वापर करुयात(How To Clean White Plastic Chairs Before Diwali).

 प्लॅस्टिकच्या पांढऱ्याशुभ्र खुर्च्यां स्वच्छ करण्यासाठी... 

१. व्हिनेगर आणि पाणी :- जर तुमच्या प्लॅस्टिकच्या पांढऱ्याशुभ्र खुर्च्यांना बुरशी लागली असेल तर एका स्प्रे बाटलीमध्ये २५ % पाणी आणि ७५ % व्हाईट व्हिनेगर घालून चांगले मिसळा. आता हे द्रावण खुर्चीवर पूर्णपणे स्प्रे करा आणि १० मिनिटे ते तसेच खुर्च्यांवर राहू द्या. त्यानंतर खुर्ची पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुवून  घ्यावी.    

सोनसळी रंगाची सोनचाफ्याच्या फुलांचा गंध ‘असा’ जपून ठेवा, पाहा वर्षानूवर्षे सोनचाफा साठवण्याची सोपी युक्ती...

२. बेकिंग सोडा :- प्लॅस्टिकच्या पांढऱ्या खुर्चीवर जर हट्टी डाग किंवा मळकट चिकट थर जमा झाल्यास तुम्ही बेकिंग सोड्याच्या मदतीने हे डाग काढू शकता. पांढऱ्या खुर्चीवरील काळे व हट्टी डाग काढून टाकण्यासाठी कोरडा बेकिंग सोडा थेट डागांवर शिंपडा. त्यानंतर १० मिनिटे बेकिंग सोडा डागांवर तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर ओल्या स्पंजच्या मदतीने हे डाग घासून पाण्याने खुर्ची स्वच्छ धुवून घ्यावी. 

३. डिशवॉश लिक्विड सोप :- प्लॅस्टिकच्या पांढऱ्याशुभ्र खुर्चीचा रंग अधिक चमकदार करण्यासाठी आपण डिशवॉश लिक्विड सोपचा वापर करु शकता. यासाठी एक मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात डिशवॉश लिक्विड सोप मिसळून त्याचे एकत्रित द्रावण तयार करून घ्यावे. त्यानंतर स्पंजच्या मदतीने हे द्रावण खुर्चीवर लावून खुर्ची घासून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर पाण्याने खुर्ची स्वच्छ धुवून घ्यावी. यामुळे खुर्ची पुन्हा नव्यासारखी पांढरीशुभ्र होऊन चमकू लागेल. 

ट्रॅव्हल बॅग्जचे व्हिल्स करा चटकन स्वच्छ, हवे फक्त २ टिश्यू पेपर्स- व्हिल्स होतील चकाचक....

४. ब्लिचिंग पावडर :- ब्लिचिंग पावडर वापरुन आपण या प्लॅस्टिकच्या पांढऱ्याशुभ्र खुर्चीवरील डाग अगदी सहजपणे काढू शकता. एका छोट्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात ब्लिचिंग पावडर मिक्स करून त्याचे द्रावण तयार करून घ्यावे. आता आपल्या हातात रबरचे हातमोजे घालून त्यानंतरच एक स्पंज घेऊन तो या द्रावणात ओला करून घ्यावा. या ओल्या स्पंजने खुर्ची घासून घ्यावी, १० मिनिटे हे द्रावण खुर्चीवर तसेच ठेवून द्यावे त्यानंतर पाण्याच्या मदतीने खुर्ची स्वच्छ धुवून घ्यावी.

Web Title: How To Clean White Plastic Chairs Before Diwali Effective Tips to Clean Your White Plastic Chairs How To Clean Plastic Chairs At Home Quick & Easy Cleaning Hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.