Lokmat Sakhi >Social Viral > स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये अडकलेली घाण निघतच नाही? ३ सोप्या ट्रिक्स; एक मिनिटांत स्वच्छ खिडकी

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये अडकलेली घाण निघतच नाही? ३ सोप्या ट्रिक्स; एक मिनिटांत स्वच्छ खिडकी

How to Clean Window Tracks Like a Pro in No Time Flat : हात न लावता, वेळेची बचत करता खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये अडकलेली घाण कशी काढायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 06:11 PM2024-10-16T18:11:12+5:302024-10-16T18:24:12+5:30

How to Clean Window Tracks Like a Pro in No Time Flat : हात न लावता, वेळेची बचत करता खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये अडकलेली घाण कशी काढायची?

How to Clean Window Tracks Like a Pro in No Time Flat | स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये अडकलेली घाण निघतच नाही? ३ सोप्या ट्रिक्स; एक मिनिटांत स्वच्छ खिडकी

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये अडकलेली घाण निघतच नाही? ३ सोप्या ट्रिक्स; एक मिनिटांत स्वच्छ खिडकी

दिवाळी (Diwali 2024) जवळ आल्यानंतर घरोघरी साफसफईची लगबग सुरु होते (Cleaning Tips). बहुतांश घरांमध्ये साफसफाईला सुरुवातही झाली असेल. साफसफाई करताना आपण घराचा कानाकोपरा स्वच्छ करतो (Diwali Cleaning). बऱ्याचदा सफाई केल्यानंतरही कुठल्यातरी कोपऱ्यात धूळ राहते. मुख्यतः खिडक्या साफ करायचं राहून जातं. खिडक्या साफ जरी केल्या तरी स्लायडिंगमध्ये जमा झालेली धूळ सहसा लवकर निघत नाही.  कारण जागा लहान असते, आणि स्लायडिंगमध्ये जमा झालेली घाण काढण्यासाठी आपल्याला व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करावा लागतो.

जर आपल्याला व्हॅक्यूम क्लीनरचा वापर न करता, अगदी सोप्या पद्धतीने स्लायडिंगमध्ये अडकलेली घाण काढायची असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे काही मिनिटात ॲल्यूमिनियमचे ट्रॅक स्वच्छ होतील. शिवाय या स्मार्ट टिप्समुळे वेळेचीही बचत होईल(How to Clean Window Tracks Like a Pro in No Time Flat).

वडिलांच्या खुन्याला शोधण्यासाठी तिनं पाहा २५ वर्षांनी काय केलं, म्हणाली-आता मला न्याय मिळाला!

खिडकीच्या ॲल्यूमिनियमचे ट्रॅकमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी स्मार्ट ट्रिक

टूथब्रश

टूथब्रशच्या मदतीने आपण खिडकीच्या स्लायडिंगमध्ये अडकलेली घाण काढू शकता. यासाठी जुना झालेला ब्रश घ्या. त्यात थोडं आगीवर ठेवून फोल्ड करा. जेनेकरून ब्रश स्लायडिंगमध्ये अडकलेली घाण सहज काढून शकेल. आता स्लायडिंगमध्ये अडकलेल घाण ब्रशच्या मदतीने जमा करा. आणि हेअर ब्लोअरच्या मदतीने कचरा काढा.

पाणी

स्लायडिंगमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी आपण पाण्याचाही वापर करू शकता. यासाठी स्लायडिंगमध्ये जर कोरडा कचरा असेल तर, तो आधी काढा. नंतर त्यात पाणी घाला. टिश्यू पेपर त्यात पसरवा. काही वेळानंतर एका लाकडी स्टिकने टिश्यू उचला. टिश्यू पेपरवर घाण जमा होईल.

टुणुक टुणुक भोपळ्याचे ९ फायदे- आजीबाईसारखी आपल्यालाही मिळेल सुपरपॉवर! आजारांनी बेजार होणंच संपेल

व्हिनेगर

व्हिनेगरच्या वापराने आपण स्लायडिंगमध्ये अडकलेली घाण काढू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा. तयार पेस्ट एका स्प्रे बॉटलमध्ये भरा, आणि स्लायडिंगमध्ये स्प्रे करा. नंतर ब्रशने घासून स्लायडिंग क्लिन करा.

Web Title: How to Clean Window Tracks Like a Pro in No Time Flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.