Lokmat Sakhi >Social Viral > रोज साफ केले तरी खिडक्या-दरवाज्यांवर धूळ बसते, घाण दिसतात? 3 टिप्स, घर राहील स्वच्छ

रोज साफ केले तरी खिडक्या-दरवाज्यांवर धूळ बसते, घाण दिसतात? 3 टिप्स, घर राहील स्वच्छ

How to Clean Windows : धूळीचे कण, घाण, जाळे जमा झाल्यानं खिडक्या, दरवाजे जुनाट दिसतात आणि घरात स्वच्छता राहत नाही. काही सोप्या टिप्स साफ-सफाई करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:34 AM2023-05-30T11:34:51+5:302023-05-30T11:55:07+5:30

How to Clean Windows : धूळीचे कण, घाण, जाळे जमा झाल्यानं खिडक्या, दरवाजे जुनाट दिसतात आणि घरात स्वच्छता राहत नाही. काही सोप्या टिप्स साफ-सफाई करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

How to Clean Windows : How To Clean A Window Quickly & Easily | रोज साफ केले तरी खिडक्या-दरवाज्यांवर धूळ बसते, घाण दिसतात? 3 टिप्स, घर राहील स्वच्छ

रोज साफ केले तरी खिडक्या-दरवाज्यांवर धूळ बसते, घाण दिसतात? 3 टिप्स, घर राहील स्वच्छ

घरात वेळच्यावेळी फरशी आणि फर्निचरची साफ-सफाई करणं गरजेचं असतं.  साफ-सफाई न केल्यास  लगेच धूळ जमा होते. (How To Clean A Window Quickly & Easily) तर काहीजण रोज खिडक्या दरवाज्यांवरची धूळ स्वच्छ करतात तरीही घर लगेच मळकट, अस्वच्छ दिसतं. (How to Clean Windows) धूळीचे कण, घाण, जाळे जमा झाल्यानं खिडक्या, दरवाजे जुनाट दिसतात आणि घरात स्वच्छता राहत नाही. काही सोप्या टिप्स साफ-सफाई करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Common Mistakes to Avoid When Cleaning Your Windows)

काचेच्या खिडक्या कशा स्वच्छ करायच्या? 

सगळ्यात आधी सुती कापडानं धूळ स्वच्छ करून घ्या. आता एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि डिटर्जेंट मिसळा.  हे डिटर्जेंट व्यवस्थित मिसळून खिडक्यांवर स्प्रे करा आणि स्पंजच्या मदतीनं रगडून खिडक्या स्वच्छ करा. टिश्यू पेपर किंवा सुती कापडानं व्यवस्थित पुसून घ्या. यामुळे खिडक्या आणि ग्लास स्लायडर स्वच्छ होण्यास मदत होते. 

खिडक्या आणि दरवाज्यांवरचे जाळे कसे स्वच्छ करायचे?

एका भांडयात  डिटर्जेट मिसळा आणि कुशन कव्हर यामध्ये बूडवून पिळून घ्या. आता दोन्ही हातात ग्लोव्हज घालून जाळ्या स्वच्छ करा. दोन्ही हातांनी जाळी स्वच्छ करा. मध्ये मध्ये कपडा खराब  झाल्यानंतर डिटर्जेंट पाण्यात बुडवून पिळून घ्या.  या उपायानं दरवाज्यांवर लागलेली धूळ स्वच्छ होण्यास मदत होईल. 

दूधाचं जळालेलं पातेलं चमकवण्याची सोपी ट्रिक; न घासता-न रगडता भांडे दिसेल चकाचक

तारपीन तेल

तारपीन तेलाचा वापर करून तुम्ही लाकडाचे दरवाजे आणि खिडक्यांवर जमा झालेली धूळ, घाण स्वच्छ करू शकता. यासाठी सगळ्यात आधी एका जुन्या भांड्यात तारपीनचं तेल घ्या. बाजारात ५० ते ६० रूपयांमध्ये तुम्हाला हे तेल सहज उपलब्ध होईल. या तेलात जुने टुथब्रश आणि स्क्रबर भिजवून दरवाजे स्वच्छ करा. स्क्रबर जास्त हार्ड नसेल याची काळजी घ्या. अन्यथा दरवाज्यावर स्क्रॅच पडू शकतात. यामुळे खिडक्या आणि दरवाज्यांची चमक परत येण्यास मदत होईल.

शिडीशिवाय बाहेरील उंच खिडक्या स्वच्छ करण्यासाठी  झाडूच्या हँडलला स्क्वीजी किंवा ब्रश जोडा. आपण एक खास विंडो क्लीनर देखील वापरू शकता जे वरच्या मजल्यापासून सर्व ठिकाणी फवारले जाऊ शकते. खिडक्यांवर जर घरातील लहान मुलांनी स्टिकर्स लावले असतील तर  हे डाग काढण्यासाठी पाण्याचा स्प्रे करून काही मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. नंतर स्क्रॅपर खिडकीवर ४५ डिग्रीच्या कोनात पकडून ठेवा आणि  दबाव देऊन पुसून घ्या. 

Web Title: How to Clean Windows : How To Clean A Window Quickly & Easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.