Join us  

लाकडी चॉपिंग बोर्ड वर्षानूवर्षे राहील नव्यासारखा स्वच्छ, बघा २ खास ट्रिक्स, काळपटपणाही जाईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2024 11:51 AM

How To Clean Wooden Chopping Board: लाकडी चॉपिंग बोर्ड वर्षांनुवर्षे टिकण्यासाठी आणि अगदी नव्यासारखा स्वच्छ राहण्यासाठी तो कशा पद्धतीने स्वच्छ करावा, हे एकदा बघून घ्या. (2 cleaning tips for removing blackness of wooden chopping board)

ठळक मुद्देपुढे सांगितलेल्या पद्धतीने जर तो बोर्ड तुम्ही स्वच्छ करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली तर तो नक्कीच अधिक काळ टिकेल. काळपट पडणार नाही. 

हल्ली भाज्या चिरण्याची विळी अगदी क्वचितच एखाद्या घरात दिसते. बहुतांश घरांमध्ये तर उभं राहून सुरीने भराभर भाज्या चिरल्या जातात. अशावेळी चॉपिंग बोर्ड खूप जास्त उपयोगी ठरतो. प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरण्यापेक्षा लाकडी चॉपिंग बोर्ड वापरणे अधिक चांगले. म्हणून आपण तो आवर्जून आणतो. पण काही दिवसांतच तो काळा पडू लागतो. असा काळपट झालेला चॉपिंग बोर्ड मग वापरायलाही नको वाटतो (How to clean wooden chopping board). असं होऊ नये म्हणून लाकडी चॉपिंग बोर्ड वापरताना काही गोष्टींची काळजी घ्या. (2 cleaning tips for removing blackness of wooden chopping board). पुढे सांगितलेल्या पद्धतीने जर तो बोर्ड तुम्ही स्वच्छ करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली तर तो नक्कीच अधिक काळ टिकेल. काळपट पडणार नाही. 

लाकडी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्याची पद्धत

 

लाकडी चॉपिंग बोर्ड कशा पद्धतीने स्वच्छ करावा, याची पद्धत alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

१. पहिली पद्धत

या पद्धतीने तुम्हाला अगदी रोजच तुमचा बोर्ड स्वच्छ करायचा आहे. यासाठी तुमचं चिरण्याचं काम झाल्यावर लगेचच चॉपिंग बोर्डवर थोडं लिक्विड सोप किंवा कोणतंही साबण टाका आणि बोर्ड घासून स्वच्छ धुवून घ्या.

गुढीपाडवा विशेष: मराठी नववर्षाची सुरुवात गोड करणारे ६ पारंपरिक पदार्थ; यातला तुमच्या आवडीचा कोणता?

यानंतर तो एखाद्या सुती कपड्याने पुर्णपणे पुसून कोरडा करून घ्या आणि त्याला व्यवस्थित हवा मिळेल अशा ठिकाणी ठेवून तो पुर्णपणे कोरडा होऊ द्या. काही जणी तसाच ओलसर बोर्ड ठेवून देतात. यामुळे तो फुगतो, त्याला चिरा पडतात आणि तो काळवंडतो.

 

२. दुसरी पद्धत

या पद्धतीने तुम्हाला दर १५ दिवसांतून एकदा चॉपिंंग बोर्ड स्वच्छ करायचा आहे. यासाठी चॉपिंग बोर्डवर थोडा बेकिंग सोडा टाका.

कमीतकमी तेल वापरून बघा कशा करायच्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या- एवढ्याशा तेलात तळा भरपूर पुऱ्या

त्यावर थोडा लिंबाचा रस पिळा आणि लिंबाच्या सालींनी घासून बोर्ड स्वच्छ करून घ्या. यानंतर पुन्हा पाण्याने बोर्ड धुवून घ्या आणि एखाद्या कपड्याने पुसून कोरडा करा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडीकिचन टिप्स