Join us  

लाकडी फर्निचर जुनाट दिसू लागलं? २ पदार्थ वापरून स्वच्छ करा, पुन्हा चमकेल अगदी नव्यासारखं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2024 12:45 PM

How To Clean Wooden Furniture: लाकडी फर्निचर कसं स्वच्छ करायचं आणि ते वर्षांनूवर्षे अगदी नव्यासारखं टिकून राहील, यासाठी काय उपाय करायचा तो बघा...

ठळक मुद्देहा उपाय केल्यामुळे घरातलं फर्निचर अगदी स्वच्छ राहील. ते जुनाट दिसणार नाही आणि त्याच्यावरची चमक वर्षांनूवर्षे अगदी जशास तशी राहील.

प्रत्येकाच्याच घरात थोड्याफार प्रमाणात का असेना पण लाकडी फर्निचर असतंच. आपण कितीही उत्तम दर्जाचं फर्निचर केलं किंवा घेतलं तरी काही वर्षांत ते थोडं जुनाट दिसू लागतं. त्यावरची चमक कमी होते. घराचे दरवाजे, डायनिंग टेबल, टीपॉय, स्वयंपाक घरातल्या ट्रॉली, कपाटं यांचा वापर जरा जास्त असल्याने ते लवकर जुने दिसायला लागतात (home remedies for maintaining shine on wooden furniture). त्यामुळे हे जुनं झालेलं फर्निचर पुन्हा नव्याने कसं चमकवायचं याचा एक सोपा उपाय बघा.. (How to clean wooden furniture)

 

लाकडी फर्निचर कसं स्वच्छ करायचं?

लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करायचे आणि ते पुन्हा अगदी नव्या सारखं कसं चमकवायचं याचा उपाय housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑईल असे फक्त २ पदार्थ लागणार आहेत.

गुळाची भेली फोडणं कठीण जातं- सगळीकडे चिकट होतं? बघा झटपट गूळ फोडण्याची सोपी युक्ती

त्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात साधारण १ लीटर पाणी घेतलं तर त्यात अर्धा लीटर व्हिनेगर आणि एक ते दीड टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल टाका.

हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि तुमच्या घरातले लाकडी फर्निचर या पाण्याने १५ दिवसांतून एकदा पुसा. फर्निचर पुसण्यासाठी एखादा मऊ, सूती कपडा वापरावा.

हा उपाय केल्यामुळे घरातलं फर्निचर अगदी स्वच्छ राहील. ते जुनाट दिसणार नाही आणि त्याच्यावरची चमक वर्षांनूवर्षे अगदी जशास तशी राहील.

 

हा उपायही करून पाहा

घरातलं फर्निचर पुन्हा चमकदार करण्यासाठी हा आणखी एक उपाय करून पाहा.

रोजच्या कामांमुळे त्वचेची काळजी घ्यायला वेळच नसतो? विकेंडला करा ५ गोष्टी, सौंदर्य खुलेल

हा उपाय करण्यासाठी ४ ते ५ टेबलस्पून खोबरेल तेल एका भांड्यात घ्या. त्यामध्ये १ ते २ चमचे व्हेजिटेबल ऑईल टाका. या मिश्रणाचे काही थेंब फर्निचरवर टाका.

एका स्वच्छ सुती कपड्याने ते व्यवस्थित पुसून घ्या. हे तेल लाकडावर सगळीकडे व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या. हा उपाय केल्यानेही जुनं फर्निचर पुन्हा नव्यासारखं चमकेल.

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडी