Lokmat Sakhi >Social Viral > लाकडी फर्निचर कधीच जुनं दिसणार नाही- वर्षांनुवर्षे चमकेल नव्यासारखं, बघा १ सोपा उपाय

लाकडी फर्निचर कधीच जुनं दिसणार नाही- वर्षांनुवर्षे चमकेल नव्यासारखं, बघा १ सोपा उपाय

How To Clean Wooden Furniture: तुमच्या घरातल्या लाकडी फर्निचरची चमक कधीच जाऊ नये असं वाटत असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा.. (best cleaning hacks for wooden furniture )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 02:26 PM2024-09-30T14:26:54+5:302024-09-30T14:27:43+5:30

How To Clean Wooden Furniture: तुमच्या घरातल्या लाकडी फर्निचरची चमक कधीच जाऊ नये असं वाटत असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा.. (best cleaning hacks for wooden furniture )

how to clean wooden furniture, how to maintain the shine of wooden furniture, best cleaning hacks for wooden furniture  | लाकडी फर्निचर कधीच जुनं दिसणार नाही- वर्षांनुवर्षे चमकेल नव्यासारखं, बघा १ सोपा उपाय

लाकडी फर्निचर कधीच जुनं दिसणार नाही- वर्षांनुवर्षे चमकेल नव्यासारखं, बघा १ सोपा उपाय

Highlightsहा उपाय केल्यामुळे फर्निचर तर स्वच्छ होईलच पण त्यावर छान चमक येऊन ते चकचकीत दिसेल. शिवाय हे मिश्रण फर्निचरवर शिंपडताच घरात एक छान सुगंध दरवळेल.

घर लहान असो किंवा मोठं असो, चार खोल्यांचा फ्लॅट असो किंवा मग मोठा ऐसपैस बंगला असो.. काही ना काही छोटं- मोठं लाकडी फर्निचर अगदी प्रत्येक घरात असतंच. लाकडाचं असल्याने आपण त्याची थोडी विशेष काळजी घेतो. पाणी, ओलसरपणा यापासून त्याला जपतो. पण तरीही अशी काळजी घेऊनही काही वर्षांनी लाकडी फर्निचरची चमक गेल्यासारखी वाटते. ते थोडं जुनाट दिसू लागतं. त्यावरचा रंग उडाल्यासारखा वाटतो. तुमच्या घरी असणाऱ्या लाकडी फर्निचरचीही गत अशीच झाली असेल तर हा एक साधा सोपा उपाय दर आठवड्याला करा (how to maintain the shine of wooden furniture?). तुमच्या घरच्या फर्निचरची चमक कधीही जाणार नाही (best cleaning hacks for wooden furniture ). ते प्रत्येकवेळी अगदी नव्यासारखं चमकून उठेल. (how to clean wooden furniture?)

 

लाकडी फर्निचरची चमक टिकून राहण्यासाठी उपाय

लाकडी फर्निचरची चमक टिकून राहण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती homehack.ig
and diy2insta या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

नवरात्रीसाठी घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणाऱ्या शुद्ध तुपातल्या फुलवाती- पाहा सोपी पद्धत

यामध्ये खोबरेल तेल, व्हिनेगर, पाणी आणि इसेंशियल ऑईल हे ४ पदार्थ वापरून लाकडी फर्निचरची स्वच्छता कशी करायची याची माहिती दिली आहे.

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये २ टेबलस्पून खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये १ कप व्हाईट व्हिनेगर आणि १ कप पाणी टाका.

 

आता या मिश्रणामध्ये सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीच्या कोणत्याही इसेंशियल ऑईलचे ३ ते ४ थेंब टाका. त्यानंतर हे सगळं मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

घटस्थापनेसाठी सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या ७ वस्तू! तुमच्या घरी आहेत का? एकदा तपासून घ्या..

आठवड्यातून एकदा तुमचं लाकडी फर्निचर स्वच्छ कोरड्या कपड्याने एकदा पुसून घ्या. जेणेकरून त्याच्यावरची धूळ निघून जाईल. 

त्यानंतर वरील पद्धतीने तयार केलेलं मिश्रण तुमच्या घरातल्या फर्निचरवर शिंपडा आणि कोरड्या सुती कपड्याने फर्निचर पुसून घ्या. हा उपाय केल्यामुळे फर्निचर तर स्वच्छ होईलच पण त्यावर छान चमक येऊन ते चकचकीत दिसेल. शिवाय इसेंशियल ऑईलचा उपाय केल्यामुळे हे मिश्रण फर्निचरवर शिंपडताच घरात एक छान सुगंध दरवळेल.


 

Web Title: how to clean wooden furniture, how to maintain the shine of wooden furniture, best cleaning hacks for wooden furniture 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.