लवकरच सणासुदीला सुरुवात होणार आहे. सणासुदीच्या काळात जवळपास प्रत्येकजण काही दिवस आधीच घराची साफसफाई करायला लागतो. (How to clean wooden temple at home) अशा परिस्थितीत घराच्या स्वच्छतेसोबतच देवाच्या मंदिराची स्वच्छता करणेही खूप गरजेचे असते. सण-उत्सवात देव्हाऱ्याची स्वच्छता करावीच लागते. (How to clean wooden temple at home) देव्हारा योग्य पद्धतीनं आणि लवकर स्वच्छ करण्याच्यासाठी काही सोप्या टिप्स या लेखात पाहूया (Home Hacks)
1) लाकडाचा देव्हारा साफसफाई करणे हे खूप सोपे काम आहे परंतु स्वच्छता करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रथम तुम्ही मंदिरातील देवाच्या मुर्ती आणि फोटो काढून बाजूला ठेवा मग देव्हारा स्वच्छ करायला घ्या.
५ सवयी सोडा, सुरकुत्या- वयवाढीच्या खुणा चेहऱ्यावर दिसणारच नाहीत, कायम दिसाल तरुण
2) पूजा करताना लाकडी मंदिरावर गुलाल किंवा चंदनाचे डाग नेहमी दिसतात. काही वेळा हे डाग सहजासहजी निघत नाहीत. अशावेळी आपण डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी या टिप्स फॉलो करा. प्रथम, 2 कप पाण्यात 1 चमचे बेकिंग सोडा मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण डाग झालेल्या भागावर स्प्रे करा आणि काही वेळ राहू द्या. सुमारे 5 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रश किंवा कॉटनने घासून स्वच्छ करा. साफसफाई केल्यानंतर काही वेळ देव्हारा उन्हात ठेवा.
चेहरा चांगलाय पण डार्क सर्कल्सनी लूक बिघडवलाय? 1 उपाय, चेहरा दिसेल ग्लोईंग
३) देव्हाऱ्यात दररोज दिवा लावला जातो, त्यामुळे अनेक वेळा तेलाचे डागही दिसतात. अनेक वेळा दिव्याच्या धुरामुळे काळे डागही पडतात. यासाठी या टिप्स फॉलो करा. यासाठी 2 कप पाण्यात 1-2 चमचे व्हिनेगर चांगले मिसळा. आता हे मिश्रण तेलाचे डाग असलेल्या ठिकाणी स्प्रे करा. यानंतर, ते कापसाच्या किंवा क्लिनिंग ब्रशने हलके स्वच्छ करा आणि काही वेळ सूर्यप्रकाशात ठेवा.
४) बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाने, तुम्ही कमी वेळात मंदिरावरील कोणतेही डाग आणि डाग साफ करू शकता. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा. सर्व प्रथम, 2 कप पाण्यात 1 चमचे बेकिंग सोडा मिसळा . आता या मिश्रणात लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. आता मंदिराचे सर्व भाग कापडाने चांगले फवारून स्वच्छ करा. स्वच्छ केल्यानंतर काही वेळ उन्हात ठेवा.