Lokmat Sakhi >Social Viral > लाकडाचे चमचे- पोळपाट-चॉपिंग बोर्ड काळे पडले? १ सोपा उपाय- १० मिनिटांत होतील नव्यासारखे स्वच्छ

लाकडाचे चमचे- पोळपाट-चॉपिंग बोर्ड काळे पडले? १ सोपा उपाय- १० मिनिटांत होतील नव्यासारखे स्वच्छ

Home Hacks: स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी वस्तू काळ्या पडल्या असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(How to Clean Wooden Spoons & Spatulas, chopping board and polpat?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 03:29 PM2024-09-27T15:29:24+5:302024-09-27T17:48:40+5:30

Home Hacks: स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी वस्तू काळ्या पडल्या असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(How to Clean Wooden Spoons & Spatulas, chopping board and polpat?)

How to Clean Wooden Spoons & Spatulas, chopping board and polpat, simple and easy trick to clean wooden utensils in kitchen | लाकडाचे चमचे- पोळपाट-चॉपिंग बोर्ड काळे पडले? १ सोपा उपाय- १० मिनिटांत होतील नव्यासारखे स्वच्छ

लाकडाचे चमचे- पोळपाट-चॉपिंग बोर्ड काळे पडले? १ सोपा उपाय- १० मिनिटांत होतील नव्यासारखे स्वच्छ

Highlightsलाकडी भांडी स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करायलाच पाहिजे.

स्वयंपाक घरात आपण लाकडी चमचे, पळ्या, लाकडाचं पोळपाट आणि लाटणं तसेच लाकडाचा चॉपिंग बोर्ड अशा वस्तू हमखास वापरतच असतो. आता स्वयंपाक करताना त्या वस्तू ओलसर होतात. त्यानंतर आपण त्या धुवून घेतो आणि ठेवून देतो. पण बऱ्याचदा त्या पुसून कोरड्या करून ठेवत नाही. त्यामुळे मग अशा सततच्या ओलसरपणामुळे स्वयंपाक घरातल्या लाकडी वस्तू हळूहळू काळ्या पडू लागतात. त्यांच्यावर काळा- पिवळा असा वेगळाच चिकट थर जमा होऊ लागतो (How to Clean Wooden Spoons & Spatulas, chopping board and polpat?). तो चिकटपणा आणि काळेपणा कसा काढून टाकावा, याविषयीची ही खास माहिती एकदा बघाच...(simple and easy trick to clean wooden utensils in kitchen)

 

स्वयंपाक घरातल्या लाकडी वस्तू स्वच्छ करण्याचा उपाय

स्वयंपाक घरातल्या लाकडी वस्तू किंवा लाकडी भांडे कसे स्वच्छ करावेत, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ dadecordiaries and dacookingdiaries या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

नवरात्रीसाठी उपवासाची भाजणी करायची? खमंग खुसखुशीत थालिपीठांसाठी घ्या १ किलो भाजणीचे अचूक प्रमाण

यामध्ये असं सांगितलं आहे की एका पातेल्यात पाणी घ्या आणि ते गॅसवर गरम करायला ठेवा. त्या पाण्यामध्ये थोडा बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि मीठ टाका. पाणी गरम झालं की त्या पाण्यात तुमचे लाकडी चमचे बुडवून ठेवा आणि ८ ते १० मिनिटांसाठी पाणी तसेच उकळत ठेवा. 

 

त्यानंतर गॅस बंद करून टाका आणि लाकडी चमचे, भांडी किंवा वस्तू गरम पाण्यातून बाहेर काढा.

यानंतर नेहमीप्रमाणे एखादे डिशवॉश लिक्विड लावून तारेच्या घासणीने ती भांडी स्वच्छ घासून घ्या. यानंतर तुम्हाला त्या भांड्यांवरचा चिकटपणा, तेलकटपणा पुर्णपणे कमी झाल्यासारखा वाटेल. 

लेटेस्ट फॅशनच्या ऑक्सिडाईज मंगळसूत्रांचे सुंदर डिझाईन्स, रोजच्या वापरासाठी असं एखादं तरी असावंच...

लाकडी भांडी स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करायलाच पाहिजे. शिवाय रोजच्या रोज जेव्हा तुम्ही ती भांडी धुवाल तेव्हा धुतल्यानंतर लगेचच ती एखाद्या कपड्याने पुसून कोरडी करून टाका. कारण लाकडी वस्तू ओलसर राहिल्या तर त्या लवकर काळ्या पडतात आणि खराब होतात. 


 

Web Title: How to Clean Wooden Spoons & Spatulas, chopping board and polpat, simple and easy trick to clean wooden utensils in kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.