Lokmat Sakhi >Social Viral > लाकडी भांडी, चमचे - पळ्या तेलकट राहतात? घ्या स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय, लाकडी भांडी चकाचक

लाकडी भांडी, चमचे - पळ्या तेलकट राहतात? घ्या स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय, लाकडी भांडी चकाचक

How To Clean Wooden Utensils At Home : लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी एक सोपी पद्धत समजून घेऊयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 03:45 PM2022-12-24T15:45:05+5:302022-12-24T15:51:36+5:30

How To Clean Wooden Utensils At Home : लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी एक सोपी पद्धत समजून घेऊयात.

How To Clean Wooden Utensils At Home | लाकडी भांडी, चमचे - पळ्या तेलकट राहतात? घ्या स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय, लाकडी भांडी चकाचक

लाकडी भांडी, चमचे - पळ्या तेलकट राहतात? घ्या स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय, लाकडी भांडी चकाचक

स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीलाच स्वयंपाकघरातील भांडी सांभाळून ठेवणं आणि स्वच्छ ठेवणं किती कठीण असते याची जाणीव असते. अस्वच्छ भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर निश्चितच दुष्परिमाण होतात. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी भांडी स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेचं आहे. लाकडी भांडी वापरल्यानंतर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण ओलाव्यामुळे बुरशी लागण्याची भीती असते. एवढेच नाही तर नीट साफ न केल्यास दुर्गंधीही येऊ लागते. जेव्हा लाकडी भांडी बुरशीजन्य होतात, तेव्हा आपण डिश वॉश लिक्विडने तासनतास साफ करतो, यामुळे भांडी लवकर खराब होतात.लाकडी भांडी तासनतास पाण्यात ठेवल्यास कुजायला लागतात. त्यामुळे लाकडी भांडी शक्यतो आर्द्रतेपासून दूर ठेवावीत.

कधीकधी बुरशीचे डाग लाकडी भांड्यांच्या चमकदारपणावर परिणाम करतात. अशा परिस्थितीत वेळोवेळी लाकडी भांडी तपासत राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात स्टील, अल्युमिनियम, तांबे, पितळ, माती तसंच लाकडाची भांडे असतात. लाकडी चमचे, चॉपिंग बोर्ड अशी लाकडी भांडी स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या वस्तू आहेत. आपण अनेकदा नॉनस्टिक भांड्यांवर चमच्याने चरे पडू नये म्हणून लाकडी चमच्यांचा वापर करतो. त्यामुळे वापरून ही भांडी खराब होण्याची शक्यता असते. तसंच ही भांडी तेल शोषून घेतात त्यामुळे ते स्वच्छ करणं हे मोठं कठीण काम असतं. डाग किंवा दुर्गंधीयुक्त भांडी वापरणं कोणाला आवडेल? जर तुमचीही अशीच परिस्थिती असेल तर लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी एक सोपी पद्धत समजून घेऊयात (How To Clean Wooden Utensils At Home).

लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठीची ही सोपी पद्धत meghna'sfoodmagic या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे. 

 

कृती -

१. एका भांड्यात पाणी घ्या. 
२. या पाण्यात मीठ व लिंबाचा रस मिक्स करून घ्या. 
३. हे मिश्रण उकळी येईपर्यंत गरम करा.
४. उकळी आल्यांनंतर या पाण्यात लाकडी चमचे बुडवून काही काळ तसेच ठेवा. 
५. थोड्यावेळानंतर हे चमचे उलटे करून विरुद्ध बाजूने सुद्धा पाण्यात बुडवून ठेवा. जेणेकरून चमच्या च्या दोन्ही बाजू स्वच्छ होतील.

Web Title: How To Clean Wooden Utensils At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.