अनेकदा आपण घर स्वच्छ करतो परंतु, घरातील अशी काही ठिकाणं असतात ज्याकडे आपलं दुर्लक्ष होते. (Bathroom cleaning hacks) घराच्या स्वच्छेतेसोबत आपल्याला आपल्या बाथरुमची स्वच्छता ठेवणं देखील गरजेचं आहे. (Easy bathroom cleaning tricks) बरेचदा आपण बाथरुम साफ करतो पण त्याच्या आतील वस्तू साफ करणे विसरतो. बादल्या मग किंवा बाथरुममध्ये ठेवलेल्या वस्तूंकडे आपण लक्ष देत नाही. (Clean yellow stains from plastic mugs) बरेच महिने साफ न केल्याने त्यावर पांढरे किंवा काळ्या डांगाचा थर साचतो. जे सहसा घासूनही निघत नाही. हे हट्टी आणि काळे-पिवळे डाग काढणं फार कठीण होते. (Remove yellow stains from plastic bathroom items)
आपण अनेकवेळा बाथरुमची फरशी, टाइल्स, भांडे आणि सिंक स्वच्छ करतो परंतु, बादल्या आणि मग कडे आपले दुर्लक्ष होते.(Hard water stain removal hacks for plastic) यावर पाण्याचे पिवळे काळे थर साचायला सुरुवात होतात. अशावेळी घाणेरडी बादली आणि मग वापरणे कठीण होते. आज आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.ज्यामुळे ते पुन्हा नव्यासारखे होतील. (How to clean plastic buckets from yellow stains)
पाणी- डिटर्जंटशिवाय धुता येतात जाडजूड ब्लँकेट-रजई, ३ सोप्या टिप्स, भिजवण्याची गरज नाही...
1. क्लिनर
बाथरुम साफ करताना आपण क्लिनरचा वापर करतो. त्या क्लिनरचा वापर करुन आपण बादली, मग आणि टेबल साफ करता येईल. त्यासाठी बाथरुम क्लिनर बादली आणि मगवर लावा. काही वेळ तसेच राहू द्या, त्यानंतर स्क्रबरच्या मदतीने घासून स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा असे केल्याने बादली आणि मगवरील डाग निघून जाण्यास मदत होईल.
2. लिंबू आणि बेकिंग सोडा
बाथरुमध्ये ठेवलेल्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा आपण वापरु शकतो. यामुळे बादल्यांवर असलेले डाग सहज काढता येतात. सोडा आणि लिंबू एकत्र मिक्स करुन त्यावर बादली आणि मग वर लावा. बादली आणि मग स्क्रबरने घासून स्वच्छ करा. असे केल्याने मग आणि बादली नव्यासारखी चमकेल.
धान्याला लागणार नाही कीड- पडणार नाही अळ्या, वर्षभर टिकतील डाळ-तांदूळ - ३ उपाय
3. ॲसिड
बाथरुम साफ करण्यासाठी अनेकदा आपण ॲसिड आणतो. परंतु ॲसिड हे सौम्य प्रमाणात असणारे आणायला हवे. त्यात थोडे पाणी मिसळा आणि हट्टी डागांवर पसरवा. बाथरुममधील बादल्या, मग आणि इतर वस्तूंवर देखील लावा. हातमोजेच्या सहाय्याने आणि ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे घाणेरड्या बाथरुमसह बादल्या मग देखील चमकतील.