शर्ट हा मेन्स वॉर्डरोबचा सर्वात आवश्यक भाग आहे (Cleaning Tips). काम, पार्टी, किंवा कुठे फिरायला जाणे. कुठल्याही प्रसंगी पुरुष वर्ग आवडीने शर्ट घालतात. शर्ट असो किंवा टी-शर्ट, जर कपडे शाईनी नसेल, कॉलरवर डाग असतील, तर चारचौघात लाजिरवाणे वाटते (Social Viral). मुख्य म्हणजे शर्ट असो किंवा टी-शर्ट कॉलरवर मळाची काळी रेष दिसतेच. जी ब्रशने घासूनही जाता जात नाही.
बऱ्याचदा ब्रशने घासून कॉलरचे कापड फाटते. ज्यामुळे आपण शर्ट पुन्हा घालणं टाळतो. सध्या उन्हाळा सुरु आहे. घामामुळे कॉलर आणखीन मळके होते. जर कॉलर अधिक मळके झाले असेल तर, टूथपेस्टची मदत घ्या. टूथपेस्टच्या वापरानेही आपण कॉलर स्वच्छ करू शकता. मेहनत न घेता काही मिनिटात शर्ट नव्यासारखा दिसेल. या क्लिनिंग टिप्समुळे आपलं काम सोपं होईल(How to clean yellow, greasy shirt collars?).
कॉलर चमकवण्यासाठी उपाय
कॉलरसोबतच हातांचे कफ आणि अंडरआर्म्स देखील घाण होतात. अनेकवेळा घासूनही डाग निघत नाही. जर डिटर्जेंट आणि ब्रशने घासूनही कॉलरचे मळके डाग निघत नसतील तर, एकदा टूथपेस्टचा वापर करून पाहा. टूथपेस्टचा वापर फक्त दात घासण्यासाठी नसून, कॉलरचे डाग घालवण्यासाठी मदत करेल.
किती आणि कधी पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात, पोट थुलथुलीत असेल तर..
कॉलरचे डाग काढण्यासाठी टूथपेस्टचा करा असा वापर
- सर्वप्रथम, एका बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात शर्ट भिजत ठेवा.
- यानंतर कॉलरवर टूथपेस्ट लावून पसरवा. त्यावर मीठ शिंपडा. ५ मिनिटे तसेच राहूद्या.
- ५ मिनिटानंतर त्यावर पुन्हा मीठ शिंपडा, आणि हाताने चोळा.
- यानंतर, शर्ट डिटर्जंट किंवा लॉन्ड्री साबणाने धुवा. या ट्रिकमुळे काही मिनिटात शर्ट चकचक नव्यासारखा दिसेल.
एसीचे कुलिंग ठीक नाही? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ३ गोष्टी तपासा, पैसे वाचतील आणि कुलिंग मस्त
कॉलर अस्वच्छ होऊ नये म्हणून..
- उन्हाळ्यात डोक्यावरून घामाच्या धारा निघतात. ज्यामुळे कॉलर अधिक कळकट होते. शिवाय मळाची काळी रेष तशीच राहते, जी घासूनही निघत नाही. त्यामुळे पांढरा शर्ट शक्यतो आठवड्यातून फक्त दोनदा घाला.
- कॉलर खराब होऊ नये असे वाटत असेल तर, मानेवर पावडर लावा. शरीराच्या स्वच्छतेची अधिक काळजी घ्या.