Lokmat Sakhi >Social Viral > डब्यांचे झाकण, त्यांचे रबर पिवळट- तेलकट झाले? १ खास उपाय, रबर- झाकण होईल नव्यासारखं चकाचक

डब्यांचे झाकण, त्यांचे रबर पिवळट- तेलकट झाले? १ खास उपाय, रबर- झाकण होईल नव्यासारखं चकाचक

Home Hacks: तुमच्याकडच्या डब्यांचे झाकणं आणि त्यांचे रबर पिवळट, कळकट झाले असतील तर ते स्वच्छ करण्याचा हा सोपा उपाय एकदा पाहून घ्या... (How to clean yellow, oily stains from tiffin rubber)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 04:57 PM2024-06-15T16:57:36+5:302024-06-15T16:58:22+5:30

Home Hacks: तुमच्याकडच्या डब्यांचे झाकणं आणि त्यांचे रबर पिवळट, कळकट झाले असतील तर ते स्वच्छ करण्याचा हा सोपा उपाय एकदा पाहून घ्या... (How to clean yellow, oily stains from tiffin rubber)

How to clean yellow, oily stains from tiffin rubber and plastic lid of tiffin | डब्यांचे झाकण, त्यांचे रबर पिवळट- तेलकट झाले? १ खास उपाय, रबर- झाकण होईल नव्यासारखं चकाचक

डब्यांचे झाकण, त्यांचे रबर पिवळट- तेलकट झाले? १ खास उपाय, रबर- झाकण होईल नव्यासारखं चकाचक

Highlightsडब्यांचे झाकण आणि त्यांचे रबर पिवळट, काळपट पडले असतील, तेलकट- चिकट झाले असतील तर ते कसे स्वच्छ करायचे, याचा उपाय

शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता वर्षभर पुन्हा डबे लागणार. आपण भाज्या किंवा डब्यात देण्याचे इतर पदार्थ कितीही कमी तेलात केले तरी भाज्यांचे किंवा अन्य पदार्थांचे डाग डब्यांच्या झाकणांना लागतात. बऱ्याच डब्यांच्या बाबतीत असं असतं की डबा स्टीलचा असतो. पण त्याचं झाकण मात्र प्लास्टिकचं. बऱ्याच झाकणांना आतल्या बाजुने एक रबरही असतं. डब्यातलं तेल बाहेर येऊ नये, हा त्याचा उपयोग. त्यामुळे तेल, भाज्या किंवा इतर पदार्थ लागून हे रबर आणि झाकण काही दिवसांतच पिवळट, तेलकट, चिकट होऊन जातं आणि ते वापरायला खूप घाण, अस्वच्छ वाटतं. म्हणूनच या दोन्ही गोष्टी कशा स्वच्छ करायच्या ते पाहा...(How to clean yellow, oily stains from tiffin rubber and plastic lid of tiffin)

डब्यांची झाकणं आणि त्यांचे रबर स्वच्छ करण्याचा उपाय

 

डब्यांचे झाकण आणि त्यांचे रबर पिवळट, काळपट पडले असतील, तेलकट- चिकट झाले असतील तर ते कसे स्वच्छ करायचे, याचा उपाय simply.marathi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

सारखं काहीतरी खावं वाटतं आणि वजन वाढतं? Over Eating टाळण्यासाठी ३ उपाय, वजन उतरेल झर्रकन..

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एखादी टोकदार वस्तू वापरून झाकणांचे रबर काढून घ्या.

त्यानंतर एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा, थोडं व्हिनेगर आणि थोडं डिशवॉश लिक्विड टाका. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की त्यात झाकणं आणि त्यांचे रबर अर्धा तास भिजत घाला.

 

यानंतर एखादा खराब टुथब्रश घ्या आणि रबर तसेच झाकण घासून घ्या. ते घासण्यासाठी ज्या पाण्यात रबर आणि झाकण भिजत टाकलं होतं, तेच पाणी वापरलं तरी चालेल.

मोबाईल- सोशल मीडियावर ‘तसलं’ काही आपली मुलं पाहतच नाही, असं वाटतं तुम्हाला? संशोधन सांगते..

तुम्ही टुथब्रशने घासताना रबराचा तसेच झाकणाचा पिवळटपणा लगेच कमी होऊन ते अगदी चकाचक दिसू लागतील. काही ठिकाणचा पिवळटपणा कमी झाला नाही तर त्यावर बेकिंग सोडा टाका आणि तेवढी जागा पुन्हा घासून घ्या. रबर किंवा झाकण अगदी चकाचक होईल. 

 

Web Title: How to clean yellow, oily stains from tiffin rubber and plastic lid of tiffin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.