महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. खवय्यांसाठी तर ही खास पर्वणीच असते. एरवी घरात एखादीच व्यक्ती उपवास करते. त्यामुळे तिच्यासाठी उपवासाचा एखादा पदार्थच केला जातो. पण महाशिवरात्रीचा उपवास बहुतांश घरांमध्ये कुटूंबातील सगळेच जण करतात (Mahashivratri 2025). त्यामुळे या दिवशी आवर्जून वेगवेगळे पदार्थ केले जातात. त्यात साबुदाणा वडा, चिप्स, चकल्या असे तळून होणारे पदार्थही असतातच. हे सगळे पदार्थ जेव्हा तळून होतात तेव्हा कढईची अवस्था बघण्यासारखी होते. तिच्यावर काळपट, चॉकलेटी, पिवळसर असे तेलाचे, तुपाचे डाग पडलेले असतात. शिवाय त्यांचा तेलकटपणाही असतोच. अशी कढई स्वच्छ करणं म्हणजे मोठंच अवघड काम. तुमचं हेच अवघड काम सोपं करण्याचे काही उपाय सुचविले आहेत (Simple And Easy Tips For Cleaning Kadhai). या उपायांमुळे तेलकट कढई खूप लवकर चकाचक होऊन जाईल.(how to clean yellow oily stains on kadhai or pan after deep frying?)
कढईचा तेलकटपणा घालवून तिच्यावरचे डाग काढण्यासाठी उपाय
१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एका भांड्यांत अगदी कडक पाणी करा आणि ते पाणी डागाळलेल्या कढईमध्ये टाका. त्यानंतर ५ ते ७ मिनिटांनी त्या पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि १ ते २ चमचे डिशवॉश लिक्विड टाकून ठेवा. पाणी कोमट झालं की तारेच्या घासणीने कढई घासून काढा. डाग लगेचच स्वच्छ झालेले दिसतील.
२. दुसरा उपाय zatpat05 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी सिंक ड्रेन क्लिनरचा वापर करावा, असं सुचविण्यात आलं आहे. हा उपाय करण्यासाठी तेलकट कढईमध्ये गरम पाणी घाला. त्यात थोडं सिंक ड्रेन क्लिनर टाका आणि ब्रशने कढई घासून घ्या. अगदी झटपट कढई स्वच्छ होईल. काही जणांना हा उपाय पटलेला नाही. कारण सिंक ड्रेन क्लिनरमध्ये खूप घातक केमिकल्स असतात त्यामुळे स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करण्यासाठी ते मुळीच वापरू नये असं ते म्हणतात. तर काहीजणांंच्या मते तुम्ही ते भांडं व्यवस्थित धुवून घेतलं तर काहीच अडचण येत नाही.