घरात असणाऱ्या वॉशबेसिनचा वापर आपण रोज करतो. शक्यतो आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरी पांढरेशुभ्र सिरॅमिकचे वॉशबेसिन हे असते. असे पांढरेशुभ्र वॉशबेसिन दिसताना फारच छान दिसते. त्यामुळे घराला एक छान लूक येतो. घरातील बहुदा सगळ्यांचेच वॉशबेसिन (How To Turn Dirty Wash Basin Sink Into Pure White at Home) हे पांढऱ्या रंगाचे असतात. पांढरेशुभ्र वॉशबेसिन जरा जरी खराब झाले तरी ते दिसताना फार वाईट दिसते. या रंगाने पांढऱ्या असणाऱ्या वॉशबेसिनची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. हे पांढरेशुभ्र वॉशबेसिन (How To Clean White Sink) आपल्याला रोज धुवून स्वच्छ ठेवावे लागते. जर आपण वेळच्यावेळी हे वॉशबेसिन स्वच्छ (Ceramic & Porcelain Sink Cleaning) केले नाही तर त्यावर काळे - पिवळे डाग पडून ते अधिकच अस्वच्छ दिसू लागते(How do I make my wash basin white again?)
वॉशबेसिन हे रंगाने पांढरेशुभ्र असल्यामुळे ते कितीही वेळा स्वच्छ केले तरीही लगेच खराब होते. खराब झाल्यामुळे या पांढऱ्याशुभ्र वॉशबेसिनचा रंग बदलून पिवळा होतो. एकदा का या पांढऱ्याशुभ्र वॉशबेसिनवर पिवळा थर साचायला लागला की ते स्वच्छ करणे (How to Clean a White Washbasin and Keep It Looking Pristine ) कठीण होऊ शकते. यासाठीच असे पांढरेशुभ्र वॉशबेसिन स्वच्छ कसे ठेवावे असा अनेक गृहिणींना प्रश्न पडतो. वॉशबेसिनवर पिवळा थर साचू न देता ते झटपट कसे स्वच्छ करता येईल, यासाठीच्या काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(How to clean white wash basin stains).
पांढरेशुभ्र वॉशबेसिन कायम नव्यासारखे दिसण्यासाठी...
१. कोल्डड्रिंक्सचा वापर करा :- घरातील पांढरेशुभ्र बेसिन स्वच्छ करण्यासाठी आपण कोल्डड्रिंक्सचा वापर करु शकतो. कोल्ड्रिंकच्या मदतीने आपण बेसिनवरील पिवळे आणि घाणेरडे डाग दूर करुन वॉशबेसिन पुन्हा नव्यासारखे चमकवू शकतो. कोल्ड्रिंक वापरण्यापूर्वी त्या कोल्डड्रिंकचा रंग काळा नाही याची खात्री करुन घ्यावी, नाहीतर बेसिनमध्ये या कोल्डड्रिंकचे डाग राहू शकतात. कोल्ड्रिंक संपूर्ण बेसिनमध्ये हळुहळु ओता कोल्ड्रिंक ओतत असताना एका ब्रशच्या मदतीने हे बेसिन स्वच्छ घासून घ्या. साधारण अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा ब्रशच्या मदतीने बेसिन घासून स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा. या उपायाचा वापर केल्यामुळे आपले पांढरेशुभ्र वॉशबेसिन हे पूर्वीसारखे चमकू लागेल.
पणत्यांमधून तेल गळून जमिनीवर तेलकट डाग पडू नये म्हणून ३ सोपे उपाय, डाग पडले तर काय ही चिंता विसरा...
२. लिंबू आणि बेकिंग सोडा :- लिंबू आणि बेकिंग सोड्याच्या मदतीने वॉशबेसिनमधील हट्टी डाग चुटकीसरशी स्वच्छ करता येतात. एका भांड्यात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करून त्याचे द्रावण तयार करावे. हे तयार द्रावण संपूर्ण बेसिनमध्ये ब्रशच्या मदतीने लावून घासून घ्यावे. थोड्या वेळासाठी हे द्रावण असेच बेसिनला लावून ठेवावे त्यानंतर पाण्याने बेसिन धुवून स्वच्छ केल्यास ते स्वच्छ, चकचकीत होईल. एवढेच नाही तर बेसिनच्या कोपऱ्यातील पिवळेपणाही नाहीसा होईल.
कपडे धुण्यापूर्वी तुम्हीसुद्धा ते तासंतास डिटर्जंटच्या पाण्यात भिजत ठेवता ? अशी चूक करु नका कारण....
३. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर :- बेसिनवरील काळे - पिवळे हट्टी डाग काढण्यासाठी, एका भांड्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगरची घट्टसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट ब्रशच्या मदतीने संपूर्ण बेसिनमध्ये लावून घ्यावी. ही पेस्ट लावून घेतल्यानंतर २ तासांनी स्पंज व पाण्याच्या मदतीने पांढरे वॉशबेसिन स्वच्छ धुवून घ्यावे. या उपायाच्या मदतीने बेसिनवरील कितीही हट्टी डाग अगदी काही मिनिटांतच दूर होईल.
वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये साचला काळा घाण थर ? ३ सोप्या ट्रिक्स, ड्रायर करा चुटकीसरशी स्वच्छ...