Lokmat Sakhi >Social Viral > बाथरुमच्या टाईल्सचे पिवळट डाग निघता निघेना? 'ही' वस्तू वापरून १० मिनिटांत करा चकाचक

बाथरुमच्या टाईल्सचे पिवळट डाग निघता निघेना? 'ही' वस्तू वापरून १० मिनिटांत करा चकाचक

How To Clean Yellow Stains On Bathroom Tiles: टाईल्सवर पिवळट डाग पडले असतील तर ते बाथरुम कितीही स्वच्छ घासलं तरी ते घाणच दिसतं. म्हणूनच त्याच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक वापरा...(simple remedies to clean yellow stains and hard water stains on bathroom tiles)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 09:02 AM2024-07-23T09:02:53+5:302024-07-23T09:05:01+5:30

How To Clean Yellow Stains On Bathroom Tiles: टाईल्सवर पिवळट डाग पडले असतील तर ते बाथरुम कितीही स्वच्छ घासलं तरी ते घाणच दिसतं. म्हणूनच त्याच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक वापरा...(simple remedies to clean yellow stains and hard water stains on bathroom tiles)

how to clean yellow stains on bathroom tiles, simple remedies to clean yellow stains and hard water stains on bathroom tiles | बाथरुमच्या टाईल्सचे पिवळट डाग निघता निघेना? 'ही' वस्तू वापरून १० मिनिटांत करा चकाचक

बाथरुमच्या टाईल्सचे पिवळट डाग निघता निघेना? 'ही' वस्तू वापरून १० मिनिटांत करा चकाचक

Highlightsबाथरुमच्या टाईल्सचा पिवळटपणा काढून टाकण्यासाठी कोणता उपाय करावा?

आपल्या शरीराची स्वच्छता करण्याचं काम आपण जिथे करतो, ते आपलं बाथरुम स्वच्छ,  चकाचक असणं गरजेचं आहे. तिथे जाऊन जर तुम्हाला घाण वाटत असेल तर मग काय उपयोग.. पण बऱ्याचदा असं होतं की बाथरुमच्या टाईल्सला एक प्रकारचा पिवळटपणा, मेणचटपणा आलेला असतो. तो काढण्याचा आपण प्रयत्न करतो, पण तो पिवळटपणा एवढा घट्ट बसलेला असतो की निघता निघत नाही. अशावेळी मग आपण वारंवार घासूनही बाथरुम घाणच दिसतं (how to clean yellow stains on bathroom tiles). तुमच्याही बाथरुमचं असंच झालं असेल किंवा बाथरुमच्या टाईल्स नुकताच पिवळा रंग धरू लागल्या असतील तर टाईल्स स्वच्छ करण्यासाठी लगेचच हा एक सोपा उपाय करून पाहा...(simple remedies to clean yellow stains and hard water stains on bathroom tiles)

बाथरुमच्या टाईल्सचा पिवळटपणा काढून टाकण्यासाठी उपाय

 

बाथरुमच्या टाईल्सचा पिवळटपणा काढून टाकण्यासाठी कोणता उपाय करावा याविषयीचा व्हिडिओ manjumittal.homehacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

नेहमी तरुण राहायचं- सुंदर दिसायचं? फक्त ५ सोप्या सवयी लावून घ्या, तारुण्य सरणारच नाही

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लिंबाच्या साली लागणार आहेत. लिंबू पिळून ते फेकू नका. आपला हा उपाय करण्यासाठी त्या राखून ठेवा.

आतून-बाहेरून कुकर खूपच काळा झाला? ३ सोपे उपाय, कुकर चमकेल नव्यासारखा-होईल स्वच्छ

साधारण ७ ते ८ लिंबाच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या. आता गाळणीमध्ये टाकून ती पेस्ट गाळून घ्या.

 

गाळून घेतलेलं जे पाणी मिळेल त्यामध्ये १ टेबलस्पून डिटर्जंट, १ कप साधं पाणी आणि १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर टाका.

पावसाळ्यात अतिपाण्यामुळे कुंडीतल्या रोपांवर रोग पडतो! 'हा' पांढरा पदार्थ मातीत टाका-रोपं वाढतील जोमानं

सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. यानंतर हे पाणी पिवळट पडलेल्या बाथरुमच्या टाईल्सवर शिंपडा. ५ ते ७ मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर तारेची घासणी घेऊन टाईल्स घासून काढा. पिवळट पडलेल्या टाईल्स बऱ्याच स्वच्छ झालेल्या दिसतील. 

 

Web Title: how to clean yellow stains on bathroom tiles, simple remedies to clean yellow stains and hard water stains on bathroom tiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.