Lokmat Sakhi >Social Viral > गाद्यांना पिवळट डाग पडले, कुबट वास येतो? बघा ३ उपाय, गाद्या होतील नव्यासारख्या स्वच्छ

गाद्यांना पिवळट डाग पडले, कुबट वास येतो? बघा ३ उपाय, गाद्या होतील नव्यासारख्या स्वच्छ

3 Remedies To Clean Mattress:गाद्यांची स्वच्छता २ ते ३ महिन्यांतून एकदा तरी होणं गरजेचं आहे. नाहीतर गाद्या अतिशय घाण होऊन जातात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 12:04 PM2024-05-30T12:04:02+5:302024-05-30T12:04:49+5:30

3 Remedies To Clean Mattress:गाद्यांची स्वच्छता २ ते ३ महिन्यांतून एकदा तरी होणं गरजेचं आहे. नाहीतर गाद्या अतिशय घाण होऊन जातात.

How to clean yellow stains on mattress? 3 remedies to clean mattress, how to get rid of odour or bad smell from matress | गाद्यांना पिवळट डाग पडले, कुबट वास येतो? बघा ३ उपाय, गाद्या होतील नव्यासारख्या स्वच्छ

गाद्यांना पिवळट डाग पडले, कुबट वास येतो? बघा ३ उपाय, गाद्या होतील नव्यासारख्या स्वच्छ

Highlightsअनेक घरांमधल्या गाद्या पिवळट, काळपट रंगाच्या झालेल्या असतात. अशा गाद्यांची स्वच्छता अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आता पाहूया...

गाद्यांवरचे बेडशीट आपण वारंवार बदलतो, पण गाद्यांच्या स्वच्छतेकडे मात्र पुर्णपणे दुर्लक्ष करतो. यामुळे मग स्वच्छ बेडशीट टाकूनही आपल्याला मनासारखा पाहिजे तसा स्वच्छपणा वाटत नाही. गाद्यांची स्वच्छता नियमितपणे झाली नाही तर त्यातून कुबट वास येऊ लागतो. पावसाळ्याच्या दिवसात तर दमट वातावरणामुळे हा वास खूपच जाणवतो. अगदी बेडशीटलाही बऱ्याचदा तो वास लागतो (How to clean yellow stains on mattress?). अनेक घरांमधल्या गाद्या पिवळट, काळपट रंगाच्या झालेल्या असतात. अशा गाद्यांची स्वच्छता अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आता पाहूया... (how to get rid of odour or bad smell from matress)

गाद्यांची स्वच्छता कशी करायची?

 

१. ऊन दाखवा

सध्याचे हवामान गाद्यांना ऊन दाखविण्यासाठी अगदी उत्तम आहे. पुढचे काही दिवसच असे कडक ऊन असणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा गाद्यांच्या स्वच्छतेसाठी करून घ्या.

मुलांचं वजन वाढतच नाही- खूपच हडकुळे दिसतात? ५ पदार्थ रोज खाऊ घाला- तब्येत सुधारेल

घरातल्या काही गाद्या टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये, अंगणात जिथे कडक ऊन येत असेल तिथे आणून ठेवा. अगदी काही तास ऊन दाखवलं तरी गाद्यांमधला कुबट, जुनाट वास निघून जाईल.

 

२. बेकिंग सोडा

गाद्यांवर जे काही पिवळट डाग पडलेले असतील त्यावर बेकिंग सोडा पसरवून टाका.

प्रत्येक आईने आपल्या लेकीला शिकवायलाच हव्यात 'या' ३ गोष्टी, लेक जन्मभर राहील सुखात

१० ते १५ मिनिटांनी त्यावर थोडा लिंबाचा रस आणि लिक्विड डिशवाॅश टाका आणि कपड्याच्या ब्रशने ती जागा घासून काढा. यानंतर ओल्या फडक्याने पुसून घ्या. डाग बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असतील.

 

३. व्हॅक्यूम क्लिनर

गाद्यांची स्वच्छता करण्यासाठी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने गादीवरची धूळ, माती पुर्णपणे स्वच्छ होईल.

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना चटका बसल्यावर खूपच आग होते? ३ टिप्स लक्षात ठेवा, त्रास कमी होईल

ही घाण गादीतून निघून गेली की आपोआपच त्यातून येणारी दुर्गंधीही कमी होईल. पण यासाठी गादी दोन्ही बाजुंनी स्वच्छ करावी. 

 

Web Title: How to clean yellow stains on mattress? 3 remedies to clean mattress, how to get rid of odour or bad smell from matress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.