Join us  

How to Clean Your Fridge  : कितीही आवरलं तरी फ्रीज अस्वच्छ, खराब दिसतो? २० सेकंदात पाहा फ्रीज नीटनेटका ठेवण्याची सोपी ट्रिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 1:34 PM

How to Clean Your Fridge : फ्रिजमध्ये कोणत्याही प्रकारचे बुरशी किंवा बॅक्टेरिया विकसित होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. म्हणून फ्रीज स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्याच्या काही ट्रिक्स माहीत असायला हव्यात.

फ्रीज हा स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रोजच्या आहारातील सर्व अन्न, मग ते ताज्या भाज्या, फळे आणि मांस असो किंवा जेवणातून उरलेले अन्न फ्रीजमध्ये साठवून ठेवतो. अशावेळी फ्रीजही महत्त्वाची जागा स्वच्छ ठेवण्याची गरज आहे! (viral video shows ingenious way of cleaning the fridge with a diy spray)

फ्रिजमध्ये कोणत्याही प्रकारचे बुरशी किंवा बॅक्टेरिया विकसित होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. म्हणून फ्रीज स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्याच्या काही ट्रिक्स माहीत असायला हव्यात. जेणेकरून फ्रीजमध्ये दुर्गंधी येणार नाही आणि तब्येतही चांगली राहील. (Easy fridge cleaning tips in marathi)

फ्रीज साफ करणे अवघड असू शकते. काही डाग काढणे खूप कठीण असते आणि काही वेळा फ्रीज साफ केल्यानंतरही दुर्गंधी येते. मग काय करायचं? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्हाला नक्की मदत करू शकतो. व्हायरल व्हिडिओ DIY स्प्रेने फ्रीज साफ करण्याचा कल्पक मार्ग दाखवले आहेत. हा DIY स्प्रे सर्व चकचकीत डाग काढून सर्व वास काढून टाकण्यासाठी पुरेसा शक्तिशाली आहे. (Viral video shows ingenious way of cleaning the fridge with a diy spray)

तुम्ही हा स्प्रे अगदी वेळेत सहज, कमी वेळात बनवू शकता आणि तुम्हाला जास्त खर्च करण्याचीही गरज नाही. आता, तुमचा फ्रीज स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला विविध रासायनिक स्वच्छता उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज नाही! या स्प्रेची आणखी एक उपयुक्त गोष्ट म्हणजे ते तीन महिन्यांपर्यंत टिकते. हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम  ब्लॉगर @mama_mila_au ने अपलोड केला आहे आणि त्याला 11.4m व्ह्यूज आणि 282k लाईक्स मिळाले आहेत.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनकिचन टिप्स