Join us  

गॅस लवकर संपतो? एकदा बर्नर 'या' पद्धतीने स्वच्छ करून पाहा; अगदी १० रुपयात बर्नर होईल क्लिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2024 5:03 PM

How to Clean Your Gas Burners : सिलेंडर लवकर संपण्याची भीतीच नाही; बर्नर मात्र महिन्यातून एकदा स्वच्छ करत राहा..

गॅस हा सर्वांच्याच घरात असतो. गॅसवर आपण अन्न शिजवतो (Cleaning Tips). शिवाय इतरही कामं गॅसवर होतात. पण गॅस स्वयंपाक करताना संपला तर, दमछाक उडते. बऱ्याचदा गॅसची फ्लेम कमी - जास्त होत असते (Gas burners). किंवा सिलेंडरमध्ये गॅस असूनही, गॅस संपले असे आपल्याला वाटते. ज्यामुळे आपण रिपेअरसाठी मेकॅनिकला घरी बोलावून घेतो. ज्यात खर्च होतो तो वेगळा.

पण बर्नरमुळेही गॅसची फ्लेम कमी होते. गॅस बर्नर स्लो चालणं, किंवा गॅस बर्नरमध्ये कचरा अडकणं, यामुळे बर्नर खराब देखील होते. त्यामुळे वेळीच गॅस बर्नर साफ करणं गरजेचं आहे. गॅस बर्नर आपण घरगुती साहित्यातही स्वच्छ करू शकता. यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज नाही(How to Clean Your Gas Burners).

गॅस बर्नर साफ करण्यासाठी लागणारं साहित्य

व्हिनेगर

पाणी

वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..

बेकिंग सोडा

अशा पद्धतीने गॅस बर्नर स्वच्छ करा

गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या. नंतर त्यात एक चमचा व्हिनेगर घालून मिक्स करा. नंतर त्यात गॅस बर्नर बाऊलमध्ये भिजत ठेवा. नंतर त्यात एक चमचा इनो घाला, आणि त्यावर थोडे कोमट पाणी घाला.

फक्त ब्रशने घासून दात मजबूत होत नाहीत; यासाठी ४ पैकी १ गोष्ट रोज खा; दुधासारखी बत्तीशी दिसेल शुभ्र

१० मिनिटांसाठी बर्नर पाण्यात भिजत ठेवा. यामुळे बर्नरच्या छिद्रामध्ये अडकलेली घाण निघून जाईल. आपण छिद्रातून घाण काढण्यासाठी सुईचा वापर करू शकता. शिवाय हवं असल्यास ब्रशला थोडे भांडी घासण्याचे साबण लावून बर्नर घासू शकता.

नंतर स्वच्छ पाण्याने बर्नर धुवून घ्या, आणि सुकवण्यासाठी पंख्याखाली ठेवा. काही वेळानंतर सुती कापडाने पुसा, आणि वापरा. अशा प्रकारे काही मिनिटात बर्नर स्वच्छ होईल.

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स