Lokmat Sakhi >Social Viral > जुने खराब झाले म्हणून कंगवे फेकू नका, ३ प्रकारे करा साफ, कंगवे होतील नवे

जुने खराब झाले म्हणून कंगवे फेकू नका, ३ प्रकारे करा साफ, कंगवे होतील नवे

How To Clean Your Hair Comb Easily अस्वच्छ कंगव्याने केस विंचरू नका, सोप्या पद्धतीने कंगवा करा साफ, केसांची काळजी घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2023 04:51 PM2023-05-14T16:51:02+5:302023-05-14T16:51:42+5:30

How To Clean Your Hair Comb Easily अस्वच्छ कंगव्याने केस विंचरू नका, सोप्या पद्धतीने कंगवा करा साफ, केसांची काळजी घ्या..

How To Clean Your Hair Comb Easily | जुने खराब झाले म्हणून कंगवे फेकू नका, ३ प्रकारे करा साफ, कंगवे होतील नवे

जुने खराब झाले म्हणून कंगवे फेकू नका, ३ प्रकारे करा साफ, कंगवे होतील नवे

केस उत्तम व सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा वापर करून पाहतो. केस स्वच्छ असेल की, केसांची समस्या वाढत नाही. केस स्वच्छ ठेवण्यासाठी आपण त्यांना नियमित धुतो. तेलाने स्काल्प मालिश करतो. केसांमधून गुंता सोडविण्यासाठी कंगव्याचा वापर करतो. कंगव्याचा वापर आपण दररोज करतो. काही जणांकडे त्यांचा स्पेशल कंगवा असतो. तर काही घरातील लोकं एकच कंगव्याने केस विंचरतात. वारंवार एकच कंगवा वापरल्याने कंगवा घाण होऊ शकतो.

कारण कंगवा फक्त गुंता सोडवत नाही तर, केसांमधील कोंडा व घाण देखील काढतो. त्यामुळे कंगव्याला साफ करणे तितकेच गरजेचं आहे. कंगवा साफ करणे हा वेळखाऊ काम आहे. परंतु, कमी वेळात झटपट कंगवा साफ करायचं असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. या पद्धतीने कंगवा लगेच साफ होईल(How To Clean Your Hair Comb Easily).

शॅम्पूने करा कंगवा साफ

केसांना साफ करण्यासाठी ज्याप्रकारे आपण शॅम्पूची मदत घेतो, त्याचप्रमाणे कंगव्याला साफ करण्यासाठी शॅम्पूचा वापर करा. यासाठी एक कप बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात एक किंवा दोन चमचे शॅम्पू घालून मिक्स करा. या पाण्यात कंगवा भिजत ठेवा. काही वेळानंतर ब्रशच्या मदतीने कंगव्यामधील घाण काढून टाका. आता पाण्याने कंगवा स्वच्छ करा.

ना डोक्यावर छप्पर ना पोटाला अन्न, ‘तिचा’ एक निर्णय आणि झाली कोट्यवधींची मालकीण..

टूथब्रशचा करा असा वापर

कंगवा साफ करण्यासाठी आपण टूथब्रशचा देखील वापर करू शकता. यासाठी कंगव्याला आधी पाण्यात भिजत ठेवा, त्याला साबण लावून टूथब्रशने साफ करा. यामुळे कंगव्याच्या दातांमध्ये अडकलेली घाण निघून जाईल.

नेलकटरसोबत असणाऱ्या दोन सुऱ्यांचे नक्की काम काय? कशासाठी त्यांचा वापर होतो?

टूथपिकने स्वच्छ करा

कंगवा स्वच्छ करण्यासाठी टूथपिक वापरणे हा देखील एक उत्तम उपाय मानला जातो. यासाठी कंगवा पाण्यात भिजवून ओला करा. व टूथपिकच्या मदतीने कंगव्याच्या दातांमधील घाण काढा. या उपायामुळे दातांमध्ये साचलेली घाण बाहेर येईल, व कंगवा स्वच्छ होईल.

Web Title: How To Clean Your Hair Comb Easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.