Join us  

ना पाणी - ना साबण; अवघ्या २ मिनिटांत कंगवा स्वच्छ करण्याची पाहा सोपी ट्रिक; कंगवा दिसेल नव्यासारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 10:00 AM

How to Clean Your Hairbrush or Comb; 2 easy tricks : फक्त २ मिनिटात कंगवा स्वच्छ कसा करावा?

केस उत्तम आणि सुंदर दिसण्यासाठी त्यांची काळजी घेणं गरजेचं (Hair Comb). केसांची निगा राखताना, आपण केस धुतो, किंवा तेलाने मालिश करतो. पण दररोज आपण केसांवर कंगव्याचा वापर करतो (Cleaning Tips). कंगव्याचा वापर करून केस विंचरल्याने केसात गुंता होत नाही. पण नियमित कंगव्याचा वापर केल्याने कंगवा खराब होतो (Hair Care). स्काल्पमधील घाण आणि धूळ, कंगव्यामध्ये जमा होते.

शिवाय तेल आणि आपलेच गळलेले केस अडकून बसतात. आपल्या रोजच्या घाईत हेअरब्रश किंवा कंगवा साफ करणे हे वेळखाऊ काम वाटू लागते. शिवाय कंगव्याच्या दातांमध्ये घाण जमा होते, जी सहसा लवकर निघत नाही. कंगवा वेळेवर साफ नाही केल्यास, कंगव्यातील घाण स्काल्प आणि केसांमध्ये अडकते. जर कंगवा साफ करणं आपल्याला वेळखाऊ काम वाटत असेल तर, एका सोप्या ट्रिकने कंगवा साफ करा. पाणी, साबणाचा वापर न करता, कंगवा स्वच्छ होईल(How to Clean Your Hairbrush or Comb; 2 easy tricks).

केस खूपच पातळ - कायम गळतात? ब्यूटी एक्सपर्ट सांगतात ३ हेअर मास्क; केसांची वेणी दिसेल दाट

कंगवा स्वच्छ करण्यासाठी पावडर आणि ब्रशचा सोपा उपाय

- सर्वात आधी, घाण झालेला कंगवा घ्या, त्यावर पावडर शिंपडा. कंगव्याला पावडरने कोट केल्यानंतर खराब टूथब्रश घ्या. टूथब्रशने कंगव्याच्या दातांमधील अडकलेली घाण काढा. या सोप्या ट्रिकमुळे कंगवा मिनिटात स्वच्छ होईल. शिवाय पाणी, साबण आणि अधिक मेहनत न घेता, कंगवा स्वच्छ होईल.

मुलं शाळेचा डबा संपवतच नाहीत? कपभर मोड आलेल्या मुगाचे करा चमचमीत थालीपीठ; डबा होईल फस्त

कंगवा स्वच्छ करण्यासाठी दुसरी ट्रिक

- कंगवा स्वच्छ करण्यासाठी आपण शाम्पूचा देखील वापर करू शकता. यासाठी एका छोट्या बादलीमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात शाम्पू घालून मिक्स करा. शाम्पूच्या पाण्यात कंगवा भिजत ठेवा. काही वेळानंतर ब्रशने घासून कंगव्यातील घाण काढा. यामुळे काही मिनिटात कंगवा स्वच्छ होईल. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया