Lokmat Sakhi >Social Viral > रोज वापरता तो टॉवेल खरंच स्वच्छ आहे का? टॉवेल स्वच्छ ठेवण्यासाठी ३ उपाय, इन्फेक्शन टाळा

रोज वापरता तो टॉवेल खरंच स्वच्छ आहे का? टॉवेल स्वच्छ ठेवण्यासाठी ३ उपाय, इन्फेक्शन टाळा

How To Clean Your Towel : टॉवेलच्या स्वच्छतेबाबत कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 11:33 AM2023-08-11T11:33:31+5:302023-08-11T13:46:53+5:30

How To Clean Your Towel : टॉवेलच्या स्वच्छतेबाबत कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात याविषयी...

How To Clean Your Towel : Is the towel you use every day clean? 3 ways to keep towels clean | रोज वापरता तो टॉवेल खरंच स्वच्छ आहे का? टॉवेल स्वच्छ ठेवण्यासाठी ३ उपाय, इन्फेक्शन टाळा

रोज वापरता तो टॉवेल खरंच स्वच्छ आहे का? टॉवेल स्वच्छ ठेवण्यासाठी ३ उपाय, इन्फेक्शन टाळा

शरीराची स्वच्छता ही अतिशय आवश्यक गोष्ट असते. म्हणूनच आपण रोजच्या रोज आंघोळ करतो. आंघोळ झाली की अंग पुसण्यासाठी आपण टॉवेल वापरतो. हे टॉवेल वेगवेगळ्या प्रकारच्या कापडाचे असतात. कापण कोणतेही असले तरी शरीराची स्वच्छता राखण्यासाठी हा टॉवेल स्वच्छ असणे गरजेचे असते. कधी आपला टॉवेल थोडा ओला राहील्याने वास येतो तर कधी तो कळकट्ट होऊन जातो. अनेकदा आपण टॉवेल मशीनमध्ये धुण्यासाठी टाकतो. मात्र तो म्हणावा तितका स्वच्छ होतोच असे नाही (How To Clean Your Towel). 

अशा खराब टॉवेलवर असलेल्या जंतुंमुळे आपल्या त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. मात्र असे होऊ नये म्हणून हा टॉवेल वेळच्या वेळी स्वच्छ करायला हवा. तसेच तो व्यवस्थित कोरडाही करायला हवा. टॉवेल अस्वच्छ असेल तर त्यावरचे बॅक्टेरीया पुन्हा आपल्या शरीरावर लागू शकतात आणि त्यामुळे काहींना त्वचेला पुरळ येणे, रॅश येऊन खाज येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच टॉवेलच्या स्वच्छतेबाबत कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात याविषयी... 

(Image : Google)
(Image : Google)

१. नीट वाळवणे महत्त्वाचे

अनेकदा आपण टॉवेल वापरला की खुर्चीत किंवा अन्य ठिकाणी टाकतो. याठिकाणी तो फोल्ड झालेला असेल तर नीट वाळत नाही. त्यामुळे टॉवेल व्यवस्थित दोरीवर एकसारखा नीट पद्धतीने वाळत घालायला हवा. यामुळे टॉवेल नीट कोरडा होण्यास मदत होईल. कोरड्या टॉवेलवर जीवाणू फार काळ राहू शकत नाहीत.

२. किमान आठवड्यातून एकदा धुवा

आपण कपडे ज्याप्रमाणे खराब झाल्यावर धुवायाल टाकतो. त्याप्रमाणे आंघोळ झाल्यावर वापरलेला टॉवेलही नियमित धुवायला हवा. अनेक जण टॉवेल न धुता कित्येक दिवस तसाच वापरत राहतात. मात्र आठवड्यातून किमान एकदा तरी टॉवेल धुवायला हवा. यामुळे तो स्वच्छ राहण्यास मदत होते. 

३. चेहऱ्याचा आणि अंगाचा टॉवेल वेगवेगळा हवा

आपण ज्या टॉवेलने चेहरा पुसतो तोच टॉवेल अंगासाठी वापरु नये. त्यामुळे टॉवेलचे २ भाग वेगळे ठेवावेत. नाहीतर २ टॉवेल पूर्ण वेगळे असावेत. त्यामुळे अंगाचे बॅक्टेरीया चेहऱ्याला लागणार नाहीत आणि चेहऱ्याचे अंगाला. या गोष्टीची योग्य ती काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. यासाठी बाजारात फेस आणि बॉडी असे दोन्ही साईडला लिहीलेले टॉवेलही मिळतात, ते आपण वापरु शकतो. 

Web Title: How To Clean Your Towel : Is the towel you use every day clean? 3 ways to keep towels clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.