आपल्या घरामध्ये अशा कितीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, ज्या आपल्याला आपल्या दैनंदिन कामामध्ये मदत करतात. ज्यामुळे आपल्या बहुमोल वेळेची आणि अंगमेहनतीची बचत होते. वॉशिंग मशीन ही आवश्यक घरगुती उपकरणांपैकी एक आहे जी कपडे धुण्यासाठी वापरली जाते. हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, त्यामुळे कपडे धुण्यासाठी हाताने काम करण्याची गरज भासत नाही. वॉशिंग मशीनचा वापर करुन कपड्यांमधून सर्वात हट्टी डाग देखील पूर्णपणे स्वच्छ केले जातात. वर्किंग वुमन्ससाठी वॉशिंग मशीन खूपच फायदेशीर ठरते(HOW TO CLEAN YOUR WASHER & DRYER).
जेव्हा आपण कपडे धुतो तेव्हा वॉशिंग मशिनच्या ड्रममध्ये पाणी भरावे लागते. या पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये डिटर्जंट घालून त्यामध्ये कपडे घालून झटपट कपडे धुण्याचे काम होते. बाकी काम मशीन स्वतःच करते. शेवटी कितीही म्हटलं तरीही वॉशिंग मशीन एक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, तिची योग्य काळजी घेतली नाही तर त्यात बिघाड होऊ शकतो. वॉशिंग मशीन जरी आपले कपडे स्वच्छ करत असली तरीही तिची स्वच्छता व देखभाल करणे महत्वाचे आहे. वॉशिंग मशिनचे ड्रायर साफ करणे खूप गरजेचे असते. तसे केले नाही आणि ड्रायर जास्त घाण (How to Deep Clean Your Washer and Dryer) झाला तर तो साफ करणे कठीण होऊन बसते आणि त्यामुळे कपडे देखील घाण होऊ शकतात. त्यामुळे घरच्या घरी वॉशिंग मशीनचा खराब झालेला ड्रायर स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूयात(How do you clean out a used washing machine and dryer?).
वॉशिंग मशीनचा ड्रायर कसा स्वच्छ करावा...
१. टॉवेलचा असा करा वापर :- सर्वप्रथम, वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून डिटर्जंट व ब्लिच घाला. यानंतर, एक टॉवेल घ्या आणि गरम पाण्यात भिजवा. मग ड्रायर साफ करण्यासाठी या टॉवेलने ड्रायरचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करुन घ्या. अशा प्रकारे वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये जमा झालेली घाण अतिशय सोप्या पद्धतीने स्वच्छ करता येऊ शकेल. टॉवेल व्यतिरिक्त आपण वाइप्स देखील वापरू शकता किंवा मायक्रोफायबर कापडाचा देखील वापर करु शकता.
वीज बिल जास्त येईल म्हणून रोज वॉशिंग मशीन लावत नाही ? ६ टिप्स, रोज मशीन लावूनही वीजबिल येईल कमी...
२. ड्रायर फिल्टर करून स्वच्छ करा :- प्रत्येक वापरानंतर ड्रायर फिल्टर स्वच्छ करण्याची सवय ठेवा. फिल्टर बाहेर काढा आणि त्यावर चिकटलेली घाण आणि लिंट काढण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करा. ब्रश किंवा हाताने साफ केल्यानंतर, फिल्टर पाण्याने स्वच्छ धुवा आणि उन्हात वाळवा. फिल्टर स्वच्छ करण्यासाठी आपण सौम्य डिटर्जंट किंवा डिशवॉश लिक्विड सोपचा देखील वापर करु शकता. स्पंज डिटर्जंटमध्ये बुडवा आणि ड्रायरच्या बाहेरील भाग स्वच्छ करुन घ्यावा. ड्रायरच्या आतील पृष्ठभागाची साफसफाई करताना ती हलक्या हाताने करावी. जास्त घासू किंवा रगडू नये यामुळे ड्रायरचा पृष्ठभाग खराब होऊन बिघडू शकतो.
वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...
३. स्वच्छता करताना काही गोष्टी लक्षात ठेवा :- वॉशिंग मशीनचे ड्रायर साफ करताना कधीही जास्त पाणी वापरू नका. याशिवाय ड्रायरचा काही भाग साफ करूनही घाण राहिला असेल तर ते फक्त हलक्या हाताने कपड्याने पुसून स्वच्छ करावा. ड्रायरचे छोटे भाग स्वच्छ करण्यासाठी आपण स्पंजचा देखील वापर करू शकता.
कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...