Join us  

दोन हजारांची महागडी साडी तुम्ही किती वेळा नेसता? -सुधा मुर्ती सांगतात बचतीचा सोपा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 6:09 PM

How To Control Buying Desire And Save Money: साड्यांमध्ये विनाकारण खूप खर्च होतो ना? म्हणूनच आता या पुढे साडीवर खर्च करण्याआधी सुधा मुर्तींचा ( Sudha Murty) हा सल्ला एकदा नक्की वाचा....

ठळक मुद्देहा विचार प्रत्येक वेळी खरेदी करताना डोक्यात आणला तर नक्कीच बचत होऊ शकते. करून बघा एकदा असं.... 

साडी म्हणजे महिलांचा जीव की प्राण... एरवी किती वेगवेगळे प्रकारचे कपडे आपण घालत असलो तरी साडी प्रेम काही कमी होत नाही. भलेही ती साडी मग किती वेळा नेसणार हा प्रश्न असतोच.. पण तरीही साडी घेण्याचा मोह सुटत नाही. आता दसरा- दिवाळी आली म्हटल्यावर साडी खरेदी होणारच. त्यातही सणावाराला साडी घ्यायची, म्हणजे मग ती स्वस्त घेऊन अनेकींना चालत नाही. पाच पाच किंवा दहा दहा हजाराच्या साड्या अगदी सहज घेतल्या जातात. साडी घरात आली की मग मात्र अनेकींची झोप उडते. मग झालेला खर्च डोळ्यांसमोर दिसू लागतो आणि उगाच एवढा पैसा खर्च केला असं वाटतं (How To Control Buying Desire And Save Money). असं तुमचंही होत असेल तर महागडी साडी खरेदी करण्यापुर्वी एकदा सुधा मुर्तींचा हा सल्ला नक्की वाचा...(precious guidance given by Sudha Murthy)

 

सुधा मुर्तींचा एक व्हिडिओ indianhustlewithpranav या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

यामध्ये त्यांनी साड्या घेताना स्वत:वर कंट्रोल करायचा असेल आणि पैसा व्यर्थ खर्च होऊ द्यायचा नसेल, तर काय करावं, हे सांगितलं आहे. यासाठी त्यांनी त्याचं स्वत:चंच उदाहरण दिलं आहे. त्या म्हणतात की कोणतीही महागडी साडी घ्यायची असेल तर ती साडी घेताना मी विचार करते की ही साडी मी किती वेळा नेसणार आहे. जर साडी महागडी असेल तर अर्थातच मी ती खूप कमी वेळा नेसेल.

मेंदूचा विकास होण्यासाठी मुलांकडे ही ४ खेळणी असायलाच पाहिजेत, वाचा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

पण साडी स्वस्तातली असेल तर मी ती नक्कीच जास्त नेसेल आणि तिचा पुरेपूर वापर करेल. त्यामुळे जिचा वापर जास्त ती साडी घेण्यास प्राधान्य द्या. कारण किंमत आणि वापर या गोष्टी बऱ्याचदा एकमेकांच्या विरुद्ध असतात. एखादी गोष्ट आपल्याकडे असावी, ही आपली इच्छा असते. पण हळूहळू ती आपली ग्रीड होते. ती सोडून द्यायला हवी. चपलांचे २० जोड आपल्याकडे असले तरी आपण एकावेळी एकच घालणार. हा विचार प्रत्येक वेळी खरेदी करताना डोक्यात आणला तर नक्कीच बचत होऊ शकते. करून बघा एकदा असं.... 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसुधा मूर्तीखरेदी