पुलाव, फ्राईड राईस, नूडल्स, फ्राय इडली अशा प्रकारच्या रेसिपी आपण जेव्हा करतो, तेव्हा त्यासाठी नॉनस्टिक प्रकारातली कढई वापरतो. कारण मग भात, नूडल्स किंवा कढईतले इतर कोणतेही पदार्थ नॉनस्टिक कढईला चिटकत नाहीत. आणि पदार्थ एकदम मोकळा होतो. त्याउलट ॲल्यूमिनियम किंवा लोखंडाच्या कढईत करायला गेल्यास कढईच्या सगळ्याच बाजूंनी तो पदार्थ चिटकून जातो. शिवाय पदार्थाचं टेक्स्चर आणि चवही थोडीफार बिघडतेच (tricks and tips to convert aluminum or iron kadhai into non stick).
आता आपल्याला जर असा एखादा पदार्थ करायचा आहे, पण घरी नॉनस्टिक कढईच नाही, तर मग आहे त्या लोखंडाच्या किंवा ॲल्यूमिनियमच्या कढईला नॉनस्टिक कसं करणार?
साखर आवडते तर बिंधास्त खा! पण किती आणि कशी खायची, वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला..
याचा एक सोपा आणि मस्त उपाय सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा उपाय करून तुम्ही घरातल्या कोणत्याही कढईला त्या रेसिपीपुरतं नॉनस्टिक करू शकता. पदार्थ तर कढईला चिकटणार नाहीच, शिवाय त्याची चवही विशेष खुलून येईल.
लोखंडाच्या कढईला कसं करायचं नॉनस्टिक?
१. सगळ्यात आधी लोखंडाची किंवा ॲल्यूमिनियमची कढई गॅसवर तापायला ठेवा. कढई चांगली तापली की कढईमध्ये तेल टाका.
हा खिचडी नकाशा पाहा, सांगा यापैकी किती प्रकारची ‘भारतीय’ खिचडी तुम्ही खाल्ली आहे?
२. गॅस मोठा ठेवून तेलही चांगले तापू द्या. तेल तापून त्यातून वाफा निघू लागल्या की मग एक जाडसर नॅपकीन घ्या.
३. नॅपकिनची जाडसर घडी घाला आणि त्याने कढईतले तापलेले तेल व्यवस्थित कढईभर पसरून घ्या. तेल कढईभर पसरले की ही कढई तुम्हाला तुमच्या रेसिपीपुरती नॉनस्टिक म्हणून वापरता येते.
हे करताना हातांची काळजी घ्या. कारण तापलेले तेल हातावर उडू शकते.