Lokmat Sakhi >Social Viral > करवंटीला चिकटून खोबरं वाया जातं? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटात करवंटीतून खोबरं निघेल बाहेर

करवंटीला चिकटून खोबरं वाया जातं? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटात करवंटीतून खोबरं निघेल बाहेर

How to crack open a fresh coconut quickly and easily with easy Method : नारळ फोडलं की खोबरं काढण्याचं काम होईल अगदी सोपं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 10:00 AM2024-09-27T10:00:13+5:302024-09-27T10:05:02+5:30

How to crack open a fresh coconut quickly and easily with easy Method : नारळ फोडलं की खोबरं काढण्याचं काम होईल अगदी सोपं

How to crack open a fresh coconut quickly and easily with easy Method | करवंटीला चिकटून खोबरं वाया जातं? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटात करवंटीतून खोबरं निघेल बाहेर

करवंटीला चिकटून खोबरं वाया जातं? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटात करवंटीतून खोबरं निघेल बाहेर

नारळ हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ आहे (Kitchen Hacks). विविध पदार्थांमध्ये खोबऱ्याचा वापर जास्त होतो. पदार्थाची चव दुप्पट वाढावी म्हणून त्यात आपण खोबरं घालतो (Coconut). खोबरं खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पण करवंटीतून खोबरं काढणं फार अवघड काम. नारळ फोडून त्यातून खोबरं सहसा लवकर निघत नाही.

मेहनत आणि वेळ दोन्ही वाया जातं. या वेळखाऊ कामामुळे आपले इतरही कामे रखडून जातात. जर आपटूनही नारळ फुटत नसेल, शिवाय करवंटीमधून खोबरं निघत नसेल तर, एक सोपा  उपाय करून पाहा. या उपायामुळे करवंटीतून  खोबरं काढणं सोपं होईल. शिवाय स्वयंपाकही झटपट होईल(How to crack open a fresh coconut quickly and easily with easy Method).

कोण म्हणतं फक्त बिट खाऊन रक्त वाढतं? खा ‘हे’ ५ पदार्थ, हिमोग्लोबिन वाढेल लवकर

करवंटीतून खोबरं कसं काढायचं?


- सर्वात आधी नारळाची शेंडी काढा. शेंडी काढल्यानंतर नारळाचे ३ छिद्र शोधा.

- स्क्रू ड्रायव्हर किंवा धारदार टोकाने, ३ छिद्र पाडून घ्या. एक वाटी घ्या. त्यामध्ये नारळातून पाणी काढून घ्या.

- दुसरीकडे गॅस चालू करा. त्यावर एक चाळण ठेवा. आणि त्यावर नारळ ठेवा.  गॅसची फ्लेम मिडीयम ठेवा. आणि पूर्ण बाजूने भाजून घ्या.

- नारळ पूर्णपणे भाजून घेतल्यानंतर करवंटीला तडे निघतील.

दूध पिता पिता दगावलं तान्हं बाळ, व्हायरल बातमी : स्तनपान करताना आईने काय काळजी घ्यायला हवी?

- आता हातोडा किंवा वरवंट्याचा वापर करून नारळाची करवंटी फोडून घ्या.

- नारळाचे दोन भाग झाल्यानंतर सुरीने करवंटीतून खोबरं बाहेर काढा. अगदी काही मिनिटात नारळातून खोबरं बाहेर निघेल. आपण या ट्रिकचा वापर करून मिनिटात नारळातून खोबरं काढू शकता. 

Web Title: How to crack open a fresh coconut quickly and easily with easy Method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.