दसरा- दिवाळी अशा मोठ्या सणांना (Dasara Diwali festival) आपण अगदी हौशीने घर सजवितो. घर सजवलं की कसं आपल्यालाही छान प्रसन्न वाटतं. शिवाय सणाचा आनंद वाढतो. आपल्या घरात एखादा सण आहे- उत्सव आहे, याचं फिलिंग घर सजविल्याशिवाय येतच नाही. म्हणूनच अगदी सध्या सोप्या ट्रिक्स- टिप्स वापरून अशा सणावाराला घर थोडं तरी सजवावंच.. दसरा दिवाळीच्या काळात बाजारात झेंडूची फुलं (marigold or zendu flower decoration) भरपूर आलेली असतात. आणि मुख्य म्हणजे या दोन सणांना झेंडूचं महत्त्व खूप जास्त आहे. त्यामुळे या सणांना भरपूर फुलं आणा आणि त्याच्या वेगवेगळ्या आयडिया करून सुंदर घर सजवा....(Home decoration ideas for festive season)
१. रांगाेळी
दारात सडा- रांगोळी केल्याशिवाय आपला कोणताच सण साजरा होऊ शकत नाही. त्यामुळे दसऱ्यालाही दारात आवर्जून रांगोळी घाला.
दसऱ्याला हवाच नथीचा नखरा! बघा १ ग्रॅम सोन्याच्या नथींचे सुंदर डिझाईन्स, पाहा कोणती घालायची?
पण फक्त तिच ती नेहमीची रंगांची रांगोळी घालण्यापेक्षा फुलांच्या छान पाकळ्या करा आणि त्याची रांगोळी घाला. फुलांची पिवळीधमक रांगोळी घराची शोभा आणखी वाढवते. घराचं आंगण ते तुमच्या घराचं दार अशा मार्गावरही छोट्या छोट्या रांगोळ्या काढा. घर फ्लॅटमध्ये असेल तर दारासमोरच्या जिन्यात प्रत्येक पायरीवर रांगोळी काढा.
२. फुलांच्या माळा
दसऱ्याला आपण घराच्या दारावर तोरण तर लावतोच. पण घराच्या आतही फुलांच्या माळा लावा.
मोरपंखी रंग आवडतो? बघा ५ प्रकारच्या सुंदर साड्या
हॉलमध्ये खिडकीचे जे पडदे असतात त्याच्या रॉडवर, दरवाजाच्या पडद्यांच्या रॉडवरही फुलांच्या माळा सोडा. छान फुलांच्या माळांचा पडदा तयार होईल.
३. घराचे कोपरे
आपल्या हाॅलमध्ये चार कोपरे तर असतातच. या कोपऱ्यात दिवाण, सोफा असं मोठं सामान ठेवलेलं असेल तर ते राहू द्या. पण त्या व्यतिरिक्त इतर जे कोपरे आहेत, तिथेही एखादं शो पीस ठेवून तो कॉर्नर छान डेकोरेट करता येतो.
कियारा, काजोल ते हेमामालिनी... बघा दुर्गापुजेसाठी कशा सुंदर नटल्या होत्या बाॅलीवूड अभिनेत्री
तसेच हॉलमधल्या टिपॉयवरही फुलांच्या पाकळ्यांनी छान सजावट करता येईल.