हिवाळा (Winter) असो किंवा ऊन्हाळा प्रत्येक ऋतूत फ्रिजरचा (Refrigerator) वापर केला जातो. पाण्याच्या बॉटल्स, आईस्क्रीम, दूध असे बरेच पदार्थ ठेवण्याासाठी फ्रिजरचा वापर केला जातो. फ्रिजरमध्ये बऱ्यादचा इतका बर्फ तयार होतो की सामान ठेवायलाही जागा नसते. फ्रिजमध्ये बर्फ तयार झाला हळूहळू पाणी सुद्धा गळू लागतं. यामुळे फ्रिज लवकर खराब होण्याचा धोका असतो. जास्त बर्फ साचण्यामुळे फ्रिज लवकर खराब होऊ शकतं. जास्त बर्फ साठल्यामुळे फ्रिज जुनाट होऊ शकतं. खराब झालेल्या फ्रिजमुळे ओव्हरऑल वीज बीलावरही परिणाम होतो. फ्रिजरमध्ये जास्त बर्फ साठू नये यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to Prevent Frosting in Your Freezer)
1) वारंवार फ्रिजचे दार उघडू नका
जर फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ तयार होत असेल तर. याचे कारण मॉईश्चर असू शकते. फ्रिजमध्ये मॉईश्चर तयार होऊ नये यासाठी कमीत कमी वेळा फ्रिज ओपन करा. फ्रिज ओपन केल्यानंतर त्यात गरम हवा आत जाते. आतली थंड हवा बाहेरची गरम हवा एकत्र झाल्याने मॉईश्चर तयार होते. नंतर याचा बर्फ तयार होतो.
२) फ्रिजरचे योग्य तापमान सेट करा
फ्रिजरमध्ये जास्त बर्फ तयार होत असेल तर त्याचे तापमान १८ डिग्री फॅरेनहाईटवर सेट करा. नंतर तुम्ही फ्रिजरचे तापमान कमी करू शकता किंवा वाढवू शकता. जास्त बर्फ तयार होऊ नये यासाठी फ्रिजचं तापमान किती ठेवलंय याकडे लक्ष द्या.
पोटाच्या टायर्समुळे कंबर मागून जाड दिसते? घरी ४ व्यायाम करा, साईड फॅट घटेल-सुडौल दिसाल
३) जास्त समान ठेवा
फ्रिजरमध्ये बर्फ तयार होऊ नये यासाठी जास्त सामान भरून ठेवा. फ्रिजरमध्ये जास्त जागा रिकामी असेल तर मॉईश्चर जास्त तयार होते. ज्यामुळे बर्फात याचे रुपांतर होते.
४) फ्रिज नियमित स्वच्छ करा
लोक फ्रिज स्वच्छ करायला विसरतात आणि डिफ्रॉस्ट होऊ देतात. फ्रिजर डिफ्रॉस्ट करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सगळे खाद्य पदार्थ काढून एका आईसबॉक्समध्ये ठेवा नंतर फ्रिजर १ तासासाठी बंद करा जेणेकरून डिफ्रॉस्ट होईल त्यानंतर साफ करून घ्या.
पोट सुटण्याच्या भितीने भात कमी खाता? या पद्धतीने हवा तितका भात खा-१ किलोही वजन वाढणार नाही
५) कंडेनसर काईल स्वच्छ करा
फ्रिजच्या मागे एक कॉईलचा सेट असतो. ज्याला कंडेनसर कॉईल म्हणतात. जे फ्रिज सुरू केल्यानंतर थंड होण्यास मदत करते. बर्फाने झाकले गेल्यामुळे ते खराब होते आणि फ्रिज व्यवस्थित काम करत नाही आणि फ्रिजमध्ये बर्फ जमा होऊ लागतो. हे टाळण्यासाठी कंडेनसर कॉईल्स स्वच्छ करा.