रांगोळीचे अनेक प्रकार आहेत. ठिपक्यांची रांगोळी, पाच बोटांची रांगोळी, फुलांची रांगोळी हे प्रकार खूप कॉमन आहे आणि ते बहुतेक सगळेच जण काढतात. पण त्यातल्या त्यात पाण्याखालची रांगोळी आणि पाण्यावर तरंगणारी फ्लोटिंग रांगोळी (How to draw floating rangoli) हे २ प्रकार जरा वेगळे आहेत. अनेक जणींना ते फार अवघड वाटतात. त्यामुळे त्या या रांगोळ्या काढण्याच्या फंदात पडत नाहीत. पण खरं पाहायला गेलं तर या दोन्ही प्रकारच्या रांगोळ्या अतिशय सोप्या असून झटपट होतात (rangoli on water ideas). शिवाय तुमच्या डेकोरेशनला त्यामुळे एक वेगळाच लूक येतो. म्हणूनच आता पाहूया की दिवाळी डेकोरेशनसाठी पाण्यावर तरंगणारी फ्लोटिंग रांगोळी कशी काढायची (Diwali decoration ideas for floating rangoli)...
पाण्यावर तरंगणारी फ्लोटिंग रांगोळी कशी काढायची?
- पाण्यावर तरंगणारी फ्लोटिंग रांगोळी काढण्यासाठी आपल्याला काही मोजक्या वस्तू लागणार आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे एक पसरट आकाराचे तबक, काचेचे भांडे किंवा मग परातीसारखी खोलगट ताटली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे टाल्कम पावडर.
चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात
- आता सगळ्यात आधी पसरट भांडे घ्या. त्या भांड्यात पाणी टाका. भांडे पाण्याने अगदी काठोकाठ भरू नका. एखादे बोट जागा राहील एवढेच पाणी भरा. आता त्या भांड्यात पावडरचा थर टाका. पावडरचा थर एकसमान बसावा यासाठी गाळण्याचा वापर करता येईल. गाळणीने आपण रांगोळीत रंग जसे भरतो, तशाच पद्धतीने पावडर त्या पाण्यात टाका.
- पावडरचा थर आता पाण्यावर व्यवस्थित बसला की मग तुमचे आवडते रंग वापरून पाण्यावर पाहिजे तसे डिझाईन काढा.
औक्षणाची सुंदर थाळी घ्या कमी किमतीत, बघा ३ सुबक पर्याय- औक्षणाचा कार्यक्रमाला येईल खास नूर
- या रांगोळीला थ्रीडी लूक द्यायचा असेल तर रांगोळी काढल्यावर जिथे थ्रीडी करायचे आहे तिथे फेव्हिकॉल टाका. २ मिनिटे फेव्हिकाॅल सेट होऊ द्या आणि त्यानंतर त्यावर रंग टाका. रांगाेळीला छान लूक येईल.
- या रांगोळीभोवती तुम्ही फुलं, पाकळ्या ठेवून आणखी सजावट करू शकता.