Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो, लवकर वाळत नाहीत? १ ट्रिक, कुबट वास गायब

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो, लवकर वाळत नाहीत? १ ट्रिक, कुबट वास गायब

How To Dry Clothes Fast In Rainy Season :

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 03:25 PM2023-06-30T15:25:55+5:302023-06-30T16:27:51+5:30

How To Dry Clothes Fast In Rainy Season :

How To Dry Clothes Fast In Rainy Season : What is the best way to dry your clothes on rainy days | पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो, लवकर वाळत नाहीत? १ ट्रिक, कुबट वास गायब

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो, लवकर वाळत नाहीत? १ ट्रिक, कुबट वास गायब

पावसाळ्यात कपडे सुकवणं म्हणजे खूपच अवघड काम. ढगाळ वातावरणामुळे कपडे सुकायला खूपच वेळ लागतो. माती- चिखलाचे डाग पडून कपडे खूपच घाण होतात. रोजच्या रोज कपडे धुतले नाही तर ते खराब होतात आणि त्यावरचे डाग तसेच राहतात. म्हणून रोज कपडे धुण्याशिवाय पर्याय नसतो. (What is the best way to dry your clothes on rainy days) जर कपडे घरात सुकवले तर सुकायला खूपच वेळ घेतात तरीही आंबट वास येतो. पंख्याखाली कपडे सुकवणं योग्य ठरतं का? पावसाळ्यात घरात कपडे सुकवण्याची योग्य पद्धत कोणती ते समजून घेऊ. (How To Dry Clothes Fast In Rainy Season)

१) कपड्यांना बाहेरच्या हवेत सुकवणं फार सामान्य आहे. घरात कपडे सुकायला खूपच वेळ लागतो.  जर तुमच्याकडे कपडे सुकवायचा रॅक नसेल तर कपडे खुर्ची, टेबल कशावरही वाळत घालावे लागतात. त्यामुळे ओल्या कपड्यांना दुर्गंध येतो.  

२) कपडे घरात सुकवत असताना योग्य वेंटिलेशन नसेल तर कसलाच उपयोग होत नाही. ओल्या कपडे लवकर सुकतील आणि त्याला कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही याची खात्री करा.

३) पावसाळ्यात वातावरणात आद्रता असते. ज्यामुळे कपडे लवकर सुकत नाहीत. अशा स्थितीत तुम्ही ओले कपडे घातल्यानं त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. 

४) उन्हाळ्यात थोडेफार ओले असलेले कपडे घातले तर ते हळूहळू  शरीरावरच सुकतात. पण पावसाळ्याच्या दिवसात कपडे व्यवस्थित सुकायला हवेत.

५) पावसात कपडे नीट सुकत नाहीत, म्हणून पंख्यामध्ये ३-४ तास कपडे सुकवल्यानंतर इस्त्री करा. असे केल्याने कपडे व्यवस्थित कोरडे होतील आणि ओलाव्यामुळे होणारा संसर्गही टाळता येईल. 

६) इतर कपड्यांच्या तुलनेत अंडरगारमेट्स व्यवस्थित सुकलेत की नाही याकडे लक्ष असू द्या. चुकूनही ओले कपडे घालू नका. पावसाळ्यात जास्तीत जास्त अंडरगारमेट्स स्वत:कडे ठेवा.

७) पावसाळ्यात कपडे व्यवस्थित सुकले नाही तर त्यांना कुबट वास येऊ लागतो. म्हणून कपडे धुताना काही खास टिप्सकडे लक्ष द्या. कपडे धुताना २ चमचे व्हिनेगरचं पाणी घाला याव्यतिरिक्त कपडे धुताना चांगल्या डिटर्जेंटचा आणि सुगंधित लिक्विडचा वापर करा.
 

Web Title: How To Dry Clothes Fast In Rainy Season : What is the best way to dry your clothes on rainy days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.