Join us  

बूट - चपला - सॅण्डल पावसात भिजतात, ते चटकन कसे सुकवाल? ३ ट्रिक्स- मिनिटात कोरडे होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2024 2:49 PM

How to Dry Shoes Quickly in Monsoon – Tips and Tricks : पावसाळ्यात झटक्यात सुकवा शूज, दुर्गंधीही होईल गायब

पावसाळ्यात वातावरण थंड होऊन सर्वत्र हिरवळ पसरते (Monsoon Tips). पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू. पण याचे देखील काही तोटे आहेत. पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी साचते. ज्यामुळे आपले शूज आणि चप्पल ओले होतात. पण ओले झालेले शूज आणि सॅण्डल लवकर सुकत देखील नाही (Cleaning tricks). त्यातून दुर्गंधी येऊ लागते.

कुबट वासामुळे आपल्याला चारचौघात लाजिरवाणे वाटते. त्यामुळे पावसाळ्यात शूज आणि सॅण्डल लवकर सुकवायचे कसे? असा प्रश्न निर्माण होतो. पायांना ओल्या शूजमुळे इन्फेक्शन होऊ नये, शिवाय लवकर शूज सुकवण्यासाठी कोणती टीप फॉलो करावी? पाहूयात(How to Dry Shoes Quickly in Monsoon – Tips and Tricks).

कागदाचा वापर करा

ओले शूज आणि सॅण्डल झटपट सुकवण्यासाठी आपण कागद किंवा टिश्यू पेपरचा वापर करू शकता. सर्वात आधी बुटाचा सोल बाहेर काढा. नंतर शूजमध्ये टिश्यू पेपर किंवा कोणताही कागद भरून ठेवा. नंतर त्यावर कागद गुंडाळा. बुटावर रबर बँड लावा. कागद बुटातील आद्रता शोषून घेईल. ज्यामुळे शूज लवकर कोरडे होतील.

रोज चपातीसोबत खायला करा लसूण - शेंगदाण्याची झणझणीत चटणी; तोंडाला येईल चव

हेअर ड्रायरचा वापर करा

हेअर ड्रायरच्या वापराने शूज सुकवणे सोपे होईल. यासाठी ड्रायरला हाय हीट मोडवर चालवा आणि फॅनचा वेगही वाढवा. नंतर शूज आतून आणि बाहेरून ड्रायरने पूर्णपणे कोरडे करा. या युक्तीने ओले शूज काही वेळातच कोरडे होतील.

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे..

टेबल फॅन

पावसात सूर्यप्रकाश कमी आणि हवामानात आद्रता भरपूर असते. त्यामुळे शूज आणि कपडे बाल्कनीमध्ये वळवण्याऐवजी पंख्याखाली वाळवा. यामुळे शूजमधील ओलावा निघून जाईल. नंतर सुती कापड किंवा कागदाने शूज पुसून काढा. 

टॅग्स :मोसमी पाऊसस्वच्छता टिप्स