Join us  

मसाला डोसा खाण्याचं भारी टेक्निक! हॉटेलमध्ये गेल्यावर डोश्यातली भाजी सापडत नाही? मग बघाच हा व्हायरल व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 1:11 PM

Social Viral: हॉटेलमध्ये गेल्यावर मसाला डोसा खाताना (how to eat masala dosa at hotel properly) हमखास अडचण होते.. आत दडलेली भाजी बाहेर काढताना जाम पंचाईत होते... यावर काय मस्त उपाय एका व्यक्तीने शोधून काढलाय ते या व्हिडिओमध्ये (viral video) बघाच.. 

ठळक मुद्देतुम्हालाही डोसा खाताना अशी अडचण येत असेल तर हा व्हिडिओ जणू काही तुमच्याचसाठी आहे, असं समजा.. 

बऱ्याचदा काही पदार्थ घरी खाताना आपण एकदम कॉन्फिडन्सनी खातो. पण तेच पदार्थ हॉटेलमध्ये जेव्हा ऑर्डर करतो, तेव्हा टेबल मॅनर्सच्या नावाखाली ते पदार्थ खाण्याचीही भीती वाटू लागते.. असाच एक आपला नेहमीचा पदार्थ म्हणजे मसाला डोसा. मस्त चकचकीत प्लेटमध्ये ठेवलेला मसाला डोसा समोर आला की सगळ्यात आधी तो कसा खावा हाच प्रश्न पडतो.. म्हणजे काट्या- चमच्याने खावं की सरळ घरी खातो तसा हातानेच मस्त ताव मारावा.. यावर काही सेकंद का असेना पण बरेच जण विचार नक्की करतात..(viral video of eating masala dosa)

 

यानंतरची दुसरी स्टेप म्हणजे आता डोशामध्ये दडलेली भाजी शोधायची कशी... डोसा इतका मस्त दुमडलेला असतो की त्यातली भाजी बाहेर काढायची म्हणजे त्या डोशाची घडी पुर्णपणे उघडावी लागते. घडी उकललेला हा डोसा मग आकाराने एवढा मोठा होतो की अक्षरश: प्लेटच्या बाहेर जाऊ लागतो. तो एका हाताने सावरायचा आणि मग दुसऱ्या हाताने भाजी बाहेर काढायची, अशी काहीशी कसरत करावी लागते... हा सगळा त्रास कमी करण्याचा एक सोपा आणि अतिशय स्मार्ट उपाय एका व्यक्तीला सुचला आहे... तुम्हालाही डोसा खाताना अशी अडचण येत असेल तर हा व्हिडिओ जणू काही तुमच्याचसाठी आहे, असं समजा.. 

 

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या _pizzandpie_ या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आला आहे. Sharing the my way to eat a MASALA DOSA अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली असून डोश्यात दडलेली भाजी शोधून काढण्याची पद्धत खरोखरंच खूप भन्नाट आहे.. यामध्ये त्रिकोणी आकाराचा एक डोसा प्लेटमध्ये दिसत आहे. त्रिकोणाच्या बरोबर मध्यभागी एक गोलाकार छेद देण्यात आला आणि भाजी खाणं एका झटक्यात सोपं होऊन गेलं.. डोसा पुर्ण न उकलता भाजी शोधून खाण्याची ही पद्धत खरोखरंच अतिशय स्मार्ट आहे.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नहॉटेलइन्स्टाग्राम