उन्हाळ्यात घरात जास्त वापर फॅनचा होतो. फॅनशिवाय माणूस घरात एक मिनिट देखील थांबू शकत नाही. फॅन हा २४ तास चालू असतो. रखरखत्या उन्हामुळे फॅन हा चालू ठेवावाच लागतो. सतत फॅन चालू असल्यामुळे तो काहीवेळेला आवाज करण्यास सुरुवात करतो. फॅनच्या आवाजामुळे आपले लक्ष इतर कामात लागत नाही, व उन्हामुळे फॅन देखील बंद ठेऊन चालणार नाही.
काही कारणास्तव फॅनमधून आवाज यायला सुरुवात होते. तेव्हा आपण फॅन दुरुस्त करणाऱ्याला बोलवून, फॅन दुरुस्त करून घेतो. पण आपण घरी देखील फॅन दुरुस्त करू शकता. मेकॅनिकला पैसे देण्यापेक्षा घरच्या घरी फॅन दुरुस्त करा. या टिप्स फॉलो करून आपण फॅन रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. काही मिनिटात नक्कीच फॅन दुरुस्त होईल(Tips to Fix a Noisy Ceiling Fan).
ब्लेड्स स्वच्छ करा
सिलिंग फॅनच्या ब्लेडवर अनेकदा धूळ साचते, ज्यामुळे पंखा चालू असताना आवाज येतो. अशा स्थितीत पंखा स्वच्छ करा. स्वच्छ कापड किंवा क्लिनरच्या मदतीने आपण पंख्यावरील घाण सहज काढू शकता. परंतु, पंखा साफ करण्यापूर्वी, वीज कनेक्शन बंद करण्याची खात्री करा.
पंख्यावर धुळीचे थर, काळाकुट्ट झालाय? २ घरगुती सोपे उपाय, डाग गायब-पंखे दिसतील चकाचक
स्क्रू घट्ट करा
सीलिंग फॅनच्या ब्लेडला जोडलेले स्क्रू अनेकदा सैल होतात. अशा स्थितीत सिलिंग फॅन आवाज करू लागतो, त्यामुळे ब्लेडला लावलेले स्क्रू सैल झाले आहे की नाही हे तपासा, व स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने सर्व ब्लेड घट्ट करा. जेणेकरून सिलिंग फॅन आवाज करणार नाही.
मोटर तपासा
मोटार खराब झाल्यामुळेही फॅन आवाज करू लागतो. त्यामुळे आपण सीलिंग फॅनची मोटर तपासू शकता. दुसरीकडे, मोटारमधून जळण्याचा वास येत असेल, तर समजा की सिलिंग फॅनची मोटर खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आपण मेकॅनिकला बोलवून पंख्यामध्ये दुसरी मोटर बसवू शकता.
फ्रिजमध्ये भरुन ठेवायच्या पाण्याच्या बाटल्या आतून स्वच्छ करण्याच्या ४ टिप्स, बाटली चकाचक झटपट
लोड तपासा
कधीकधी छतावर लटकलेला पंखा तिरकस होतो, ज्यामुळे पंख्याचे वजन एका बाजूला सरकते, व पंखा चालू होताच आवाज येऊ लागतो. अशावेळी सिलिंग फॅन बंद करून ताबडतोब सरळ करा, अन्यथा पंखा खराब होऊ शकतो.
घरात लावा ही ५ रोपं, तुमच्या घरात उन्हाळयात चुकूनही डास येणार नाहीत...
पंख्याला ऑयलिंग करा
काही वेळा पंख्यामध्ये लावलेले तेल सुकल्याने पंखा आवाज करतो. अशावेळी पंख्याच्या सर्व भागांमध्ये थोडे तेल टाका. याशिवाय कपड्याला तेल लावून ब्लेडवरही चोळा. यामुळे पंख्यामधून आवाज येणार नाही. महिन्यातून एकदा पंख्याला तेल लावणे उत्तम ठरेल.