किचन सिंकचा वापर नियमित होतो (Kitchen Tips). यात आपण भाज्या स्वच्छ करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत सर्व काही करतो. यात अनेकदा खरकटं अडकतात. ज्यामुळे किचन सिंक तुंबते (Kitchen Sink). आणि पाणी अडकून राहते. अशावेळी प्लंबरला बोलावून घेतो, आणि किचन सिंकमध्ये अडकलेलं पाणी काढून घेतो. किचन सिंकची पाईप स्वच्छ असूनही अनेकदा सिंक ब्लॉक होते. सिंक ब्लॉक होण्यामागे एक कारण म्हणजे तेल आणि तूप.
यावर उपाय म्हणून आपण सिंकच्या पाईपमध्ये कोमट पाण्यात बेकिंग सोडा मिसळून घालतो. पण हे उपाय उपयुक्त ठरेलच असे नाही. जर किचन सिंक ब्लॉक होऊ नये असं वाटत असेल तर, अल्युमिनियम फॉइलचा वापर करून पाहा. पण याचा वापर नेमका कसा करता येईल याच्या वापराने किचन सिंक कधीच ब्लॉक होणार नाही का? पाहा(How to Fix an Overflowing Kitchen Sink in 1 Fast Step).
आवळा मीठ लावून खा, तब्येतीसाठी वरदान ठरणारे केवळ १० रुपयांचा उपाय - तारुण्य टिकेल कायम
किचन पाईपवर अल्युमिनियम फॉइलचा करा असा वापर
- सर्वप्रथम, किचन सिंक आणि ड्रेनेज पूर्णपणे स्वच्छ करा. सिंक साफ केल्यानंतर त्यात ग्लासभर कोमट पाणी घाला. जेणेकरून पाईप स्वच्छ होईल. पाईप कोरडे झाल्यानंतर सिंक पाईपला अल्युमिनियम फॉइल गुंडाळा. टेपने अल्युमिनियम फॉइल चिकटवा.
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
- यामुळे सिंकपासून उंदीरही दूर राहील. कारण सिंक पाईपला कुरतडण्याचं काम उंदीर करतात. ज्यामुळे किचन सिंकची पाईप लवकर खराब होते. परंतु, अल्युमिनियम फॉइलमुळे उंदीर किचन सिंकजवळ फिरकणार नाही.
- हिवाळ्यात पाणी आणि वातावरण थंड असते. ज्यामुळे सिंक पाईपमध्ये तेल - तूप चिकटते. ज्यामुळे पाणीही ब्लॉक होते. यावर उपाय म्हणून अल्युमिनियम फॉइल पाईपला गुंडाळा. यामुळे किचन सिंक ब्लॉक होणार नाही.
- यासह किचन सिंकच्या भोवती असलेली जागा गंजते. यावर उपाय म्हणून आपण अल्युमिनियम फॉइलचा वापर करू शकता.