सध्या लॅपटॉप, मोबाईल फोन यांसारख्या गॅजेट्सचा अगदी रोजच्या जीवनात सर्रास वापर केला जातो. आपल्यापैकी काहीजण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करत असतात. ऑफिसचे काम करायचे असेल तर लॅपटॉपशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. याशिवाय, कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी देखील लॅपटॉप उपयोगी येतो. लॅपटॉपच्या माध्यमातून गेम खेळण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकूणच पाहायला गेले तर लॅपटॉपचा वापर आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तासंतास वापर केल्यामुळे स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप देखील गरम होत असल्याची समस्या जाणवत असते.
अनेकदा लॅपटॉप एवढा गरम होतो की, त्याचा वापर करणे देखील शक्य होत नाही. यामुळे आपल्या परफॉर्मेंसवर देखील याचा परिणाम होतो. अनेकदा लॅपटॉपमध्ये काही टेक्निकल बिघाड असल्यामुळे तो वारंवार गरम होण्याची समस्या जाणवते. अशा स्थितीमध्ये आपण सर्विस सेंटरमध्ये लॅपटॉपला दाखवू शकतो. याशिवाय, लॅपटॉपची बॅटरी देखील खराब झाल्याची शक्यता असू शकते. परंतु सर्विस सेंटरमध्ये जाण्याआधी आपण जर काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर त्याच्या मदतीने लॅपटॉप गरम होण्याची समस्या काही प्रमाणात कमी होईल. ऑनसाईटगो या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, लॅपटॉप सतत गरम होत असल्यास नेमके काय उपाय करायचे ते पाहूयात. (How to Fix an Overheating Laptop ? 5 Simple Tips and Solutions).
लॅपटॉप वारंवार वापरल्याने गरम होऊ नये म्हणून काही सोप्या टिप्स...
१. लॅपटॉपवर साचलेला धुळीचा थर काढून टाका :- सध्या बाजारात एकापेक्षा एक चांगले लॅपटॉप उपलब्ध होतात. कंपन्या या लॅपटॉपमध्ये व्हेंटिलेशनसाठी सीपीयू पंखे देतात. स्मार्टफोन सारख्या गॅजेट्सच्या तुलनेत लॅपटॉपमध्ये वेळेनुसार धूळ जमा होण्याचा धोका अधिक असतो. जर आपला लॅपटॉप जास्त गरम होत असेल तर, सर्वप्रथम एअर वेंट किंवा सीपीयू आणि पूर्ण कूलिंग सिस्टममध्ये धूळ जमा झाली नाही ना, हे एकदा तपासून पाहा. आपण ही साचलेली धूळ मऊ ब्रश किंवा कपड्याने साफ करू शकता.
सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...
२. ओरिजनल चार्जरचा वापर करा :- लॅपटॉपसोबत आलेला मूळ चार्जर खराब झाल्यानंतर अनेकदा आपण पैशांची बचत करण्यासाठी कमी किंमतीतील बनावट चार्जर खरेदी करतो. मात्र, यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. बाजारात अनेक थर्ड पार्टी चार्जर्स स्वस्तात उपलब्ध आहेत. मात्र, चार्जरचा उपयोग केल्यास तुमचा लॅपटॉप खराब होऊ शकते. बनावट चार्जरचा वापर केल्याने लॅपटॉप चार्ज होण्यासाठी देखील जास्त वेळ लागतो व हीटिंगची समस्या निर्माण होते. त्यामुळे नेहमी लॅपटॉपसोबत येणाऱ्या चार्जरचाच वापर करावा.
३. लॅपटॉप कूलिंग पॅडचा वापर करावा :- लॅपटॉपसोबत दिल्या जाणाऱ्या कूलिंग पॅडचा देखील आपण वापर करु शकतो. यामुळे चार्जिंग आणि इतर काम करताना लॅपटॉप अधिक गरम होणार नाही. कूलिंग पॅडमुळे लॅपटॉला अतिरिक्त कूलिंग सपोर्ट मिळतो. आपण लॅपटॉपसोबत दिले जाणारे कुलिंग पॅड वापरु शकता किंवा बाजारातून नवीन कूलिंग पॅडची खरेदी करू शकता. तसेच, लॅपटॉपला सलग तासंतास वापरण्याऐवजी आपण काही मिनिटे लॅपटॉप बंद देखील ठेवू शकता. यामुळे लॅपटॉप पुन्हा व्यवस्थितरित्या काम करू शकेल.
अरे बापरे, लॅपटॉपवर पाणी सांडले? घ्या १ सोपी ट्रिक, झटपट करा ड्राय, टाळा नुकसान...
४. खोली ठेवा थंड :- अनेकदा लॅपटॉपमध्ये कोणतीही समस्या नसते. मात्र, आपण ज्या ठिकाणी याचा वापर करत आहात, तेथील तापमान अधिक असल्यास लॅपटॉप देखील गरम होतो. खासकरून उन्हाळ्यात अशाप्रकारची समस्या जाणवते. अशा स्थितीमध्ये आपण खोली थंड राहील याची काळजी घेऊ शकता. लॅपटॉप अधिक गरम होऊ नये यासाठी एसी, कूलर आणि पंख्याचा वापर करू शकता. याशिवाय, थेट सूर्याचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी लॅपटॉप ठेवणे टाळावे.
५. गरजेपेक्षा जास्त अॅप्स एकाचवेळी सुरु ठेवू नका :- लॅपटॉप सुरू केल्यानंतर अनेकदा बॅकग्राउंडला अनेक अॅप्लिकेशन सुरू असतात. लॉग इन दरम्यान अनेक अनावश्यक अॅप्स आणि सेवा सुरू होतात. यामुळे लॅपटॉपच्या प्रोसेसरवर अधिक लोड येतो. याचा परिणाम परफॉर्मेंसवर देखील होतो. तसेच, लॅपटॉप वापरत असतानाच चार्जिंगला कनेक्ट केले असल्यास देखील समस्या निर्माण होते. अनावश्यक अॅप्स बॅकग्राउंडला सुरू असल्यास लॅपटॉपची बॅटरी देखील लवकर संपते. त्यामुळे अशा अॅप्सना बंद करा. यामुळे लॅपटॉप गरम होण्याची समस्या काही प्रमाणात कमी होईल.