Join us  

गॅसची फ्लेम स्लो झालीये ? ३ ट्रिक्स; गॅसची फ्लेम चटकन वाढेल-स्वयंपाक कमी वेळात बनेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 1:49 PM

How To Fix Burner Low Flame At Home : गॅस स्टोव्ह पूर्णपणे क्लिन करणं कठीण होतं अशावेळी काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात.

सिलेंडर, स्टोव्ह किंवा लायटर किचनमधील सगळ्यात महत्वाच्या सामानांपैकी एक आहेत. दिवसभरात काहीना काही कामांसाठी याचा वापर केला जातो.  (How To Fix Burner Low Flame AT Home )गॅस स्टोव्ह हा सगळ्यात महत्वाचा असला तरी अनेकदा स्वच्छतेकडे किंवा नीटनेटकेपणाकडे लक्ष न दिल्यास रोजच्या गॅसच्या वापरात अडथळे येऊ शकतात. (Kitchen Hacks) जसं की गॅसची फ्लेम स्लो होणं, गॅस कमी चालणं अशाही समस्या उद्भवतात.  गॅस स्टोव्ह पूर्णपणे क्लिन करणं कठीण होतं अशावेळी काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात. (How To Fix Low Flame On LPG Gas Burners)

जीटी टुल्सच्या रिपोर्टनुसार गॅस बर्नरमधून व्यवस्थित फ्लेम बाहेर येण्यासाठी तुमची एलपीजी सिलेंडरची टाकी रिकामी आहे की नाही ते तपासा, साबणाचे पाणी आणि ब्रशचा वापर करून गॅस स्वच्छ करून घ्या.गॅसच्या बर्नरला गंज लागला नसेल याची काळजी घ्या.

ओटी पोट सुटलंय-मागून कंबर मोठी दिसते? रोज 'हा' पदार्थ खा-झरझर घटेल चरबी, मेटेंन राहाल

गॅस स्टोव्हची जाळी स्वच्छ करा

स्टोव्हची जाळी साफ करू शकता कारण त्या जाळीत छिद्र येणं बंद होत आणि त्यामुळे गॅसची फ्लेम मंद होते.  गॅसची फ्लेम हलकी मंद होते. म्हणून स्टोव्ह साफ करण्याबरोबरच जाळी साफ करण्यावरही लक्ष द्या. हा उपाय करण्यासाठी जाळी व्हिनेगरच्या पाण्यात १५ ते ३० मिनिटांसाठी भिजवून ठेवा. गॅसची स्टोव्हच्या बर्नरमधून कमी फ्लेम बाहेर येत असेल तर ते फिक्स करण्यासाठी सिलेंडर रेग्युलेटर बंद करून कनेक्शन वेगळे करा आणि पाईपसुद्धा वेगळा करा.

गॅसचा पाईप चेक करा

गॅस पाईप नियमित चेक करत राहा. कारण पाईप घाणेरडा किंवा जुना झाला असेल तर  स्वयंपाक करताना अडथळे येऊ शकतात. कारण पाईप खराब असेल तर स्टोव्हपर्यंत  फ्लेम व्यवस्थित पोहोचू शकत नाही. चांगल्या परिणामांसाठी पाईप दर आठवड्याला चेक करत राहा. ३ महिन्यांच्या अंतराने पाईप बदलत राहा.

गॅस स्टोव्ह उघडून चेक करा

डाळ किंवा दूध शिजवताना गॅस बर्नरवर पडते त्यामुळे गॅस कमी चालू लागतो.  याचमुळे गॅसला गंज लागू शकतो. हे टाळण्यासाठी नट बोल्ट उघडून  स्टोव्ह व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कापडाच्या मदतीने स्वच्छ करा. कापडाने स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर पुन्हा गॅस बर्नर जागेवर ठेवा. गॅस बर्नर किंवा गॅस पाईप चेक केल्यानंतरही फ्लेम लो असेल तर ते साफ करण्यासाठी स्क्रु ड्रायव्हरचा वापर करू शकता. 

टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.