Lokmat Sakhi >Social Viral > घरातल्या प्लास्टिकच्या वस्तूंना तडे गेले? फक्त २ पदार्थ लावून करा दुरुस्ती- होईल नव्यासारखं दणकट 

घरातल्या प्लास्टिकच्या वस्तूंना तडे गेले? फक्त २ पदार्थ लावून करा दुरुस्ती- होईल नव्यासारखं दणकट 

Home Hacks To Repair Plastic Furniture: प्लास्टिकच्या वस्तूंना थोडीशी चीर पडली म्हणून ती लगेच फेकून देऊ नका. (How to fix cracked plastic?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2024 09:04 AM2024-08-07T09:04:33+5:302024-08-07T09:05:01+5:30

Home Hacks To Repair Plastic Furniture: प्लास्टिकच्या वस्तूंना थोडीशी चीर पडली म्हणून ती लगेच फेकून देऊ नका. (How to fix cracked plastic?)

How to fix cracked plastic, how to repair cracks on plastic furniture using simple trick | घरातल्या प्लास्टिकच्या वस्तूंना तडे गेले? फक्त २ पदार्थ लावून करा दुरुस्ती- होईल नव्यासारखं दणकट 

घरातल्या प्लास्टिकच्या वस्तूंना तडे गेले? फक्त २ पदार्थ लावून करा दुरुस्ती- होईल नव्यासारखं दणकट 

Highlightsअशी वस्तू मग आपल्याला इच्छा नसली तरी टाकून द्यावी लागते. तुमचंही असंच होत असेल तर आता इथून पुढे तसं करू नका

प्रत्येक घरात प्लास्टिकच्या कितीतरी वस्तू असतात. अगदी चमच्यांपासून ते मोठमोठाल्या कपाटापर्यंत. कारण या वस्तू टिकाऊ तर असतातच शिवाय खिशाला परवडणाऱ्याही असतात. प्लास्टिकच्या बादल्या, मग, टब, खुर्च्या असे साहित्य तर जवळपास प्रत्येक घरातच दिसते. पण बऱ्याचदा असं होतं की वापरून वापरून किंवा मग एखाद्यावेळी ती वस्तू पडल्यामुळे, तिच्यावर काहीतरी आदळल्यामुळे तिला तडा जातो. चीर पडते (Home Hacks To Repair Plastic Furniture). अशी वस्तू मग आपल्याला इच्छा नसली तरी टाकून द्यावी लागते. तुमचंही असंच होत असेल तर आता इथून पुढे तसं करू नका (How to fix cracked plastic). चिरा पडलेल्या किंवा तडा गेलेल्या प्लास्टिकच्या वस्तू घरच्याघरी कशा दुरुस्त करून नव्यासारख्या दणकट करायच्या ते पाहा...(how to repair cracks on plastic furniture using simple trick?)

 

प्लास्टिकच्या वस्तूंना चीर पडल्यास किंवा तडा गेल्यास काय उपाय करावा?

घरगुती वापरातल्या प्लास्टिकच्या वस्तूंना चीर पडल्यास किंवा तडा गेल्यास काय उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा एक छानसा व्हिडिओ homecheff_renu या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

साबुदाणा वडे, खिचडी तर नेहमीचीच, आता करा साबुदाणा पराठा! श्रावणातले उपवास होतील जास्त चवदार

त्यासाठी ज्या वस्तूला तडा गेला आहे, त्या वस्तूच्या उलट्या बाजुने जिथे तडा गेला आहे त्यावर बेकिंग सोडा टाका. यानंतर त्या सोड्यावर फेव्हिक्वीक लावा. १० ते १५ सेकंदानंतर फेव्हिक्विक वाळेल आणि ती वस्तू पुन्हा व्यवस्थित जोडली जाईल. 

नकळतपणे पालकांकडूनच मुलांना लागू शकतात ५ चुकीच्या सवयी, बघा तुमच्याकडूनही नेमकं तेच होतंय का

हा उपाय करण्यासाठी सोडा वापरल्यामुळे त्या वस्तूला त्याच ठिकाणी लवकर तडा जाणार नाही. नाहीतर बऱ्याचदा आपण गम लावून ती वस्तू चिटकवतो पण तिला काही दिवसांतच पुन्हा तडा जातो. 


 

Web Title: How to fix cracked plastic, how to repair cracks on plastic furniture using simple trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.