Lokmat Sakhi >Social Viral > घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; घर नेहमी दिसेल नीटनेटकं

घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; घर नेहमी दिसेल नीटनेटकं

How to Fix Cracked Tile : काही वेळा जड वस्तू पडल्यामुळे फरशा तुटतात. काहीवेळा फरशी किंवा भिंतीच्या फरशा व्यवस्थित न लावल्यामुळे तुटतात. तुटलेल्या टाईल्स बदलण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:43 PM2022-06-14T16:43:12+5:302022-06-14T17:07:48+5:30

How to Fix Cracked Tile : काही वेळा जड वस्तू पडल्यामुळे फरशा तुटतात. काहीवेळा फरशी किंवा भिंतीच्या फरशा व्यवस्थित न लावल्यामुळे तुटतात. तुटलेल्या टाईल्स बदलण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात.

How to Fix Cracked Tile : How to repair cracked floor tiles at home | घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; घर नेहमी दिसेल नीटनेटकं

घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; घर नेहमी दिसेल नीटनेटकं

प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे स्वत:चं घर. स्वयंपाकघरापासून बाल्कनीपर्यंत आपलं घर नीटनेटकं, हवेशीर, प्रसन्न असावं असं प्रत्येकालाच वाटतं. (Home Hack) घरातील सर्व सदस्य त्याकडे लक्ष देतात. मात्र काही कारणाने घराच्या छताला तर कधी घराच्या टाइल्सला तडा जातो.  भेगांमध्ये नेहमी धूळ आणि घाण असल्याने ते चांगले दिसत नाही. (How to repair cracked floor tiles at home)

काही वेळा जड वस्तू पडल्यामुळे फरशा तुटतात. काहीवेळा फरशी किंवा भिंतीच्या फरशा व्यवस्थित न लावल्यामुळे तुटतात. तुटलेल्या टाईल्स बदलण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. अशा स्थितीत, जर टाइल्सचे जास्त नुकसान झाले नसेल आर्थिक नुकसानही होतं. म्हणूनच या लेखात तुम्हाला टाईल्स घरीच टाईल्स दुरूस्त करण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत. (How to Hide or Repair Cracked Tiles in Your Home)

तुटलेल्या टाईल्स दुरूस्त करण्यासाठी तुम्हाला 100-200 ग्रॅम पांढरे सिमेंट, एक ते दोन पॅक इपॉक्सी द्रव, बेकिंग सोडा किंवा रबिंग अल्कोहोल, चाकू हे साहित्य लागेल. यासाठी तुम्ही हार्डवेअरच्या दुकानात जाऊन या वस्तू खरेदी करू शकता, जर तुमच्याकडे या वस्तू असतील तर पैशांची बचत होऊ शकते.

नळातून कमी वेगानं पाणी येतं? ४ ट्रिक्स वापरा, प्लंबरला न बोलावताच पाण्याचा वेग वाढेल

1) सगळ्यात आधी टाईल्स साफ करा

खराब झालेल्या टाइल्स दुरुस्त करण्यासाठी, सर्वप्रथम, आपण तुटलेल्या फरशा व्यवस्थित स्वच्छ करा. यासाठी प्रथम ते पाण्याने स्वच्छ करा. पाण्याने स्वच्छ केल्यानंतर, बेकिंग सोडा किंवा अल्कोहोल घासून स्वच्छ करा. टाइल्स साफ केल्याने त्यातील धूळ आणि घाण निघून जाईल.  स्वच्छ केल्यानंतर 10-15 मिनिटे कोरडे होऊ द्या.

किचन सिंकमध्ये चुकूनही फेकू नका ५ गोष्टी; पाईप ब्लॉक होऊन पाणी कधी तुंबेल कळणारही नाही

2) इपोक्सी लिक्विड आणि व्हाईट सिमेंट एकत्र करा

फरशा स्वच्छ केल्यानंतर एका भांड्यात इपॉक्सी लिक्विड, पांढरे सिमेंट आणि एक ते दोन चमचे पाणी टाका. या तीन गोष्टी घातल्यानंतर साधारण ५-१० मिनिटे  एकत्र करून ठेवा करा. जास्त पाणी  लागणार नाही याची काळजी घ्या. मिश्रण तयार केल्यानंतर सेट होण्यासाठी काही वेळ असेच ठेवा.

३) आता तुटलेल्या फरशा दुरुस्त करा

यासाठी चमच्याच्या मदतीने तुटलेल्या टाइल्सवर इपॉक्सी मिश्रण लावा आणि त्याच चमच्याने चांगले पसरवा. इपॉक्सी मिश्रण पसरवल्यानंतर, सुमारे 10-15 मिनिटे असेच राहू द्या जेणेकरून मिश्रण चांगले कोरडे होईल. 15 मिनिटांनंतर, मिश्रण चांगले सुकले आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या बोटाने स्पर्श करा. जर मिश्रण सुकले असेल तर चाकूच्या साहाय्याने अतिरिक्त इपॉक्सी द्रव काढून टाका आणि बेकिंग सोड्याने फरशी पुन्हा स्वच्छ करा. या सोप्या उपायानं तुम्ही घरच्याघरीच फरश्या दुरूस्त करू शकता.
 

Web Title: How to Fix Cracked Tile : How to repair cracked floor tiles at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.