Lokmat Sakhi >Social Viral > गॅस बर्नरची फ्लेम लो झाल्याने स्वयंपाकात खूप वेळ जातो? २ सोपे उपाय, घरच्या घरी होईल काम...

गॅस बर्नरची फ्लेम लो झाल्याने स्वयंपाकात खूप वेळ जातो? २ सोपे उपाय, घरच्या घरी होईल काम...

How To Fix Gas Burner Low Flame at Home : काही सोप्या युक्त्या वापरल्या तर ही फ्लेम मोठी करता येऊ शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 10:17 AM2022-09-14T10:17:38+5:302022-09-14T10:20:01+5:30

How To Fix Gas Burner Low Flame at Home : काही सोप्या युक्त्या वापरल्या तर ही फ्लेम मोठी करता येऊ शकते.

How To Fix Gas Burner Low Flame at Home : Does the gas burner flame take too long to cook? 2 easy solutions, work at home... | गॅस बर्नरची फ्लेम लो झाल्याने स्वयंपाकात खूप वेळ जातो? २ सोपे उपाय, घरच्या घरी होईल काम...

गॅस बर्नरची फ्लेम लो झाल्याने स्वयंपाकात खूप वेळ जातो? २ सोपे उपाय, घरच्या घरी होईल काम...

Highlights बर्नरला गंज लागतो आणि बर्नर जाम होण्याचीही शक्यता असते. अशावेळी नट-बोल्ट काढून गॅस कापडाने साफ करावा.  गॅस बर्नर काढून तो व्हिनेगरच्या पाण्यात १५ ते २० मिनीटे भिजवून ठेवावा.

स्त्रियांची रोज सकाळी फारच घाई असते. अशावेळी आपण एका हाताने स्वयंपाक, एका हाताने इतर साफसफाईची किंवा बाकी कामं करत असतो. डोक्यात ऑफीसचे किंवा घरगुती विचार चालू असतात. तोंडाने मुलांना आणि नवऱ्याला किंवा आणखी कोणाला काही सुचना देत असतो. अशावेळी आपल्याला एका गॅसवर चहा, एकीकडे नाश्ता आणि एकीकडे जेवणाच्या डब्यातील पोळीभाजी असे सगळेच करायचे असते. अशावेळी गॅसची फ्लेम चांगली मोठी असेल तर सगळ्या गोष्टी झटपट होतात. पण अनेकदा ही फ्लेम काही ना काही कारणाने लहान झालेली असते. त्यामुळे आपला स्वयंपाकात आणि ओट्यापाशी खूप वेळ जातो. सणावाराच्या वेळी तर एकावेळी जास्त पदार्थ करायचे असल्यावर आपली पुरती तारांबळ उडते (How To Fix Gas Burner Low Flame at Home). 

आता गॅस बर्नरची फ्लेम अचानक कमी का होते? गॅस फडफडून बंद का होतो? य़ामध्ये कोणते बिघाड झाल्याने असे घडते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा सिलिंडर भरलेला असूनही अचानकपणे गॅस फडफडतो किंवा जातो. अशावेळी सतत गॅस लावावा लागतो, यामध्ये बराच वेळ जातो आणि स्वयंपाकाला आणि पुढच्या सगळ्या गोष्टींना उशीर होतो. काही वेळा तर गॅसची फ्लेम इतकी लो असते की एखादा पदार्थ व्हायला अर्धा किंवा पाऊण तास वेळ जातो. काही सोप्या युक्त्या वापरल्या तर ही फ्लेम मोठी करता येऊ शकते. या य़ुक्त्या कोणत्या आणि त्या कशा करायच्या हे समजून घेऊया.

१. असा साफ करा गॅसचा बर्नर

गॅसच्या बर्नरला बरीच छिद्रे असतात, ही छिद्रे त्यामध्ये घाण किंवा अन्नाचे कण अडकल्याने बंद होतात. त्यामुळे गॅसचे बटण मोठे असूनही गॅस अतिशय बारीक चालतो किंवा काही वेळा फडफडतो. त्यामुळे आपण गॅस जेव्हा साफ करतो तेव्हा आठवणीने त्याची जाळीही बारकाईने साफ करायला हवी. यासाठी हा गॅस बर्नर काढून तो व्हिनेगरच्या पाण्यात १५ ते २० मिनीटे भिजवून ठेवावा. यामुळे बर्नरमध्ये अडकलेले कण निघून जाण्यास मदत होते आणि बर्नर साफ होतो. असे केल्याने फ्लेम मोठी होण्यास मदत होते.  

२. गॅस पूर्ण उघडून साफ करा

काही वेळा घाईघाईत आपल्याकडून दूध उतू जाते किंवा वांगे भाजताना, पापड, फुलके भाजताना त्याचे कण गॅसच्या बर्नरमध्ये अडकतात. त्यावेळी आपण घाईत असल्याने नंतर साफ करु असे म्हणून आपण ते काम तसेच ठेवतो आणि ऑफीसला किंवा बाहेर निघून जातो. बाहेरुन आल्यावर गॅसवर काही सांडले होते हेही अनेकदा आपल्य़ा लक्षात राहत नाही. या गोष्टी बराच काळ अशाच राहील्या तर बर्नरला गंज लागतो आणि बर्नर जाम होण्याचीही शक्यता असते. अशावेळी नट-बोल्ट काढून गॅस कापडाने साफ करावा. 

Web Title: How To Fix Gas Burner Low Flame at Home : Does the gas burner flame take too long to cook? 2 easy solutions, work at home...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.