Join us  

वॉशिंग मशीनच्या पाईपमधून कमी प्रेशरने पाणी येतं? मेकॅनिकला न बोलावता घरीच करा दुरुस्त; पाहा ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 6:56 PM

How to fix slow water flow on a washing machine : पैसे वाचवा, घरीच वॉशिंग मशीनचा पाईप दुरुस्त करा

आजकाल प्रत्येक घरात वॉशिंग मशीनचा वापर होतो (Washing Machine). वॉशिंग मशीनमध्ये कपडे सहज धुतले जातात. एकदा का वॉशिंग मशीनमध्ये कपडे, डिटर्जेंट आणि पाणी घातलं की वॉशिंग मशीनचं काम सुरु होतं (Cleaning Tips). टाईम सेट केल्यानंतर वॉशिंग मशीन बंद होते, आपण त्यात पुन्हा पाणी घालून वॉशिंग मशीनमध्ये टाईम सेट करतो. अगदी काही मिनिटात वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले जातात.

पण बऱ्याचदा वॉशिंग मशीनच्या पाईपमधून कमी प्रेशरने पाणी येत असल्यामुळे पाणी बादलीने टाकण्याची वेळ येते. पण वॉशिंग मशीनच्या पाईपमधून कमी दाबाने पाणी आल्यास, आपण मेकॅनिकला  बोलावतो. ज्यामुळे पैसे देखील खर्च होतो. पण आपण पैसे खर्च न करता, घरातच पाईप स्वच्छ करू शकता. यामुळे निश्चितच पाईपमधून प्रेशरने पाणी येईल(How to fix slow water flow on a washing machine).

रोज चपातीसोबत खायला करा लसूण - शेंगदाण्याची झणझणीत चटणी; तोंडाला येईल चव

घरच्या घरी वॉशिंग मशीनच्या पाईपमधून प्रेशर कसं वाढवायचं?

- वॉशिंग मशीन स्वच्छ करताना ड्रम, व्हील, जाळी आणि बाहेरील भाग स्वच्छ करतो. पण पाण्याच्या पाईपकडे आपण सहसा लक्ष देत नाहीत. हा पाईप खोलून पाहिल्यास त्यात बराच साचलेला आपल्याला पाहायला मिळेल. ज्यामुळे पाईपमधून पाणी कमी दाबाने बाहेर येते.

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे..

वॉशिंग मशीनच्या पाईपमध्ये फिल्टर (जाळी) लावलेले असते. ज्यामुळे पाण्यात असलेली घाण फिल्टरमध्ये अडकते. ज्यामुळे पाईपमधून कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे पाईपच्या फिल्टरची देखील स्वच्छता देखील करायला हवी. अशाने पाईपमधून प्रेशरने पाणी येईल. शिवाय पाणी आणि वेळ देखील वाया जाणार नाही. जर आपण वॉशिंग मशीन स्वच्छ करत असाल तर, पाईप देखील स्वच्छ करा. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल