Join us  

टी शर्टचा गळा, बाह्या सैल पडल्या? १ सोपी ट्रिक- टी शर्टला मिळेल नव्यासारखी फिटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2024 11:52 AM

How To Fix Stretch Neck And Sleeves Of T-Shirt: टी शर्ट गळ्याभाेवती सैलसर झाला म्हणून तो टाकून देत असाल तर थोडं थांबा आणि ही एक मस्त ट्रिक पाहा. (Home remedies for loose fitting t shirt)

ठळक मुद्देअसा फिटिंग बिघडलेला टी शर्ट घालावा वाटत नाही आणि पैसे वाया जातात म्हणून टाकूनही द्यावा वाटत नाही.

हल्ली घरातल्या प्रत्येकाकडे टी शर्ट असतातच. उन्हाळ्यात तर मऊसूत टी शर्ट अंगात घातला की बरं वाटतं. अगदी घरापासून ते कॅज्यूअली बाहेर फिरायला जाण्यापर्यंत सरसकट सगळीकडे टी शर्ट घालणं अनेकांना आवडतं. कारण ते खूप आरामदायी वाटतात. पण बऱ्याचदा असं होतं की टीशर्ट बाकी सगळा चांगला असतो, पण त्याचा गळा सैल पडून ओघळल्यासारखा वाटतो (How to fix stretch neck and sleeves of t shirt). बाह्या सैल होतात. असा फिटिंग बिघडलेला टी शर्ट घालावा वाटत नाही आणि पैसे वाया जातात म्हणून टाकूनही द्यावा वाटत नाही. (Home remedies for loose fitting t shirt)

 

म्हणूनच आता हा एक उपाय पाहून घ्या. यामध्ये टी शर्टचा सैलसर पडलेला गळा आणि बाह्या पुन्हा पुर्वीसारख्या परफेक्ट फिटिंगच्या कशा करायच्या, याचा अगदी सोपा उपाय आपण पाहणार आहोत.

कॉटनचे कपडे धुतल्यानंतर आकसतात? करून बघा १ खास उपाय- सिल्क साड्यांसाठीही उपयुक्त

हा उपाय mommywithatwist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुई- दोरा असं काहीही लागणार नाही. काहीही न शिवता टी शर्ट पुन्हा कसा व्यवस्थित करायचा, ते पाहा.

 

टी शर्टचा गळा- बाह्या सैलसर झाला असल्यास उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक रबरबॅण्ड आणि एका पातेल्यात उकळतं पाणी एवढंच साहित्या लागणार आहे.

सैलसर झालेला गळा किंवा बाह्या जवळजवळ करून घ्या. आणि थोडं अंतर ठेवून त्याच्या खाली रबरबॅण्ड लावून टाका.

अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत

यानंतर टीशर्टच्या गळ्याचा म्हणजेच रबर जिथे लावलं आहे, त्याच्या पुढचा भाग दिड ते दोन मिनिटांसाठी उकळत्या पाण्यात बुडवून ठेवा. 

यानंतर काही वेळाने रबर काढून टाका. सैलसर झालेला गळा किंवा बाह्या पुन्हा परफेक्ट फिटिंगच्या झालेल्या दिसतील. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी