Lokmat Sakhi >Social Viral > पाकिटात चिप्स- चिवडा उरला तर पाकिटाचं तोंड बंद करण्याची १ खास ट्रिक, प्रवासात ठरेल उपयुक्त

पाकिटात चिप्स- चिवडा उरला तर पाकिटाचं तोंड बंद करण्याची १ खास ट्रिक, प्रवासात ठरेल उपयुक्त

Kitchen Tips: प्रवासात असताना ही युक्ती खूप उपयोगाची ठरणारी आहे. त्यामुळे एकदा बघूनच घ्या की रबर, स्टॅपलर नसतानाही पाकिट व्यवस्थित बंद कसं करायचं...(How to fold the packet of left over chips, chivda?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 02:51 PM2023-08-21T14:51:00+5:302023-08-21T14:53:56+5:30

Kitchen Tips: प्रवासात असताना ही युक्ती खूप उपयोगाची ठरणारी आहे. त्यामुळे एकदा बघूनच घ्या की रबर, स्टॅपलर नसतानाही पाकिट व्यवस्थित बंद कसं करायचं...(How to fold the packet of left over chips, chivda?)

How to fold the packet of left over chips, chivda without using rubber or stapler pin | पाकिटात चिप्स- चिवडा उरला तर पाकिटाचं तोंड बंद करण्याची १ खास ट्रिक, प्रवासात ठरेल उपयुक्त

पाकिटात चिप्स- चिवडा उरला तर पाकिटाचं तोंड बंद करण्याची १ खास ट्रिक, प्रवासात ठरेल उपयुक्त

Highlightsपाकिट रबर, स्टॅपलर न लावताही कसं व्यवस्थित पॅक करायचं, त्याची ही सोपी पद्धत एकदा बघून घ्याप्रवासात तर ही युक्ती खूपच कामी येणारी आहे. 

हल्ली चिप्स, चिवडा, कुरकुरे असे पदार्थ जवळपास प्रत्येक घरातच आणले जातात. या पदार्थांची पाकिटे घरात आली की आपण ते फोडतो त्यातला हवा तेवढा पदार्थ खातो. पदार्थ लगेचच संपला तर ठीक. पण नाही संपला तर मात्र त्या पाकिटाची तशीच गुंडाळी करतो आणि ते पाकीट ठेवून देतो. यामुळे होतं काय की तो पदार्थ या पावसाळी दिवसात एक तर सादळून जातो आणि चिवट होतो. किंवा मग दुसरं म्हणजे गडबडीत असताना आपण धावपळीत ते पाकिट तसंच उचलतो आणि आतला पदार्थ सांडतो, वाया जातो. म्हणूनच हे पाकिट रबर, स्टॅपलर न लावताही कसं व्यवस्थित पॅक करायचं, त्याची ही सोपी पद्धत एकदा बघून घ्या (How to fold the packet of left over chips, chivda without using rubber or stapler pin). प्रवासात तर ही युक्ती खूपच कामी येणारी आहे. 

 

प्रवासात तर हमखास आपण चिप्स, चिवडा, कुरकुरे असे पाकिटबंद पदार्थ विकत घेतो. बऱ्याचदा जेवढं घेतलं तेवढं काही संपत नाही. पण सोबत रबर किंवा स्टॅपलर असं काहीही आपण नेलेलं नसतं.

श्रावणात शंकराला वाहतो तो बेल बहूगुणी, केस आणि त्वचेच्या तक्रारीही होतील दूर- बेल पानांचा औषधी उपाय

त्यामुळे अशावेळी ते पाकीट पुन्हा व्यवस्थित बंद कसं करायचं, हे जाणून घेणं कधीही उपयुक्तच ठरेल. याबाबतचा एक छानसा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या shivesh17 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

स्टॅपलर, पिना न वापरता पाकिट बंद करण्याची पद्धत
यासाठी सगळ्यात आधी पाकिटाचे उजवीकडचे आणि डावीकडचे टोक तिरके करा आणि दुमडून घ्या. ज्या बाजूने ही टोके दुमडली आहेत, त्याच्या विरुद्ध बाजूने छोटे- छोटे आडवे फोल्ड देऊन पाकिट गुंडाळा.

कांद्याचे थालीपीठ तर नेहमीचेच, करून बघा मुगाच्या डाळीचे खुसखुशीत- खमंग थालीपीठ, घ्या सोपी रेसिपी 

३ ते ४ वेळेस फोल्ड करून झाले की मग सुरुवातीला दोन्ही टोकांना आपण जी दुमड घातली होती, ती उघडून पुढच्या बाजूने वळवा. पाकिट व्यवस्थित बंद होऊन जाईल. ते उलटे झाले किंवा आडवे- तिडवे कसेही झाले, तरीही त्यातून पदार्थ सांडणार नाही. करून बघा.

 

Web Title: How to fold the packet of left over chips, chivda without using rubber or stapler pin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.