Join us

रात्री घरात बारीक झुरळं खूप फिरतात? १ सोपा उपाय, कानाकोपऱ्यात लपलेल्या झुरळांचा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:11 IST

How To Ged Rid Of Cockroaches From Home (Jhural Ghalvnyache Upay) : झुरळांना पळवून लावण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात.

वातावरणात मॉईश्चर वाढल्यामुळे झुरळांची संख्याही वाढते. एकदा घरात झुरळं शिरले की ते पुन्हा जाण्याचं नाव घेत नाहीत (How To Ged Rid Of Cockroaches From Home). रात्रीच्यावेळी घरात अन्नाचे कण पडले असतील तर झुरळं येण्याचं प्रमाण वाढतं. किचनमध्ये तर कधी बाथरूमध्ये झुरळं दिसून येतात.  झुरळांना पळवून लावण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. (Effective Ways To Get Cockroaches)

अनेकदा झुरळं नाकात दम येईपर्यंत घरात धुमाकूळ घालतात. तुमच्या घरीही झुरळांनी कहर केला असेल असेल तर तुम्ही सोपे उपाय करून झुरळांना पळवून लावू शकता (How To Ged Rid Of Cockroaches From Home). हा घरगुती उपाय सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  झुरळांना पळवून लावण्यासाठी  पेस्ट बनवायची असेल तर तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज लागणार नाही. 

यासाठी कोणते सामान लागेल?

बोरीक एसिड, एक चमचा गव्हाचे पीठ, अर्धा चमचा साखर, दूध......बोरीक एसिड तुम्हाला कोणत्याही मेडीकलमध्ये सहज मिळेल. यात एक चमचा गव्हाचं पीठ आणि अर्धा चमचा साखर  घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. ही पेस्ट बनवण्यासाठी थोडं दूध घ्या. एक जाड पेस्ट तयार  करा. त्यात थोडं थोडं दूध घालून मिसळत राहा. ज्यामुळे झुरळांना पळवून लावण्यास मदत होईल.

शुगर सतत वाढते? नाश्त्याला हा खास डोसा खा, कंट्रोलमध्ये राहील शुगर-डायबिटीसचा धोका टळेल

कसा वापर करावा?

ही पेस्ट बनवल्यानंतर ३० मिनिटांसाठी तसंच ठेवा.  थोड्या वेळानं याचा वापर करा. नंतर चमचा किंवा बोटाच्या मदतीने पेस्ट अशा जागेवर ठेवा. ज्या ठिकाणी झुरळं सर्वात जास्त दिसून येतात. किचन कॅबिनेट, गॅसच्या खाली, सिंकजवळ ठेवा. ज्यामुळे झुरळं येणं कमी होईल. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया