Lokmat Sakhi >Social Viral > बोटात गच्च अडकलेली अंगठी निघता निघत नाही? ३ उपाय, न दुखता अंगठी निघेल सहज

बोटात गच्च अडकलेली अंगठी निघता निघत नाही? ३ उपाय, न दुखता अंगठी निघेल सहज

How to Get a Ring Off: 3 Easy Steps अंगठी बोटात अडकल्यावर काय करावं सुचत नाही, बोट सुजतं, अंगठी तशीच ठेवली तर दुखंतही. त्यासाठी हे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 03:07 PM2023-04-20T15:07:35+5:302023-04-20T15:08:14+5:30

How to Get a Ring Off: 3 Easy Steps अंगठी बोटात अडकल्यावर काय करावं सुचत नाही, बोट सुजतं, अंगठी तशीच ठेवली तर दुखंतही. त्यासाठी हे उपाय

How to Get a Ring Off: 3 Easy Steps | बोटात गच्च अडकलेली अंगठी निघता निघत नाही? ३ उपाय, न दुखता अंगठी निघेल सहज

बोटात गच्च अडकलेली अंगठी निघता निघत नाही? ३ उपाय, न दुखता अंगठी निघेल सहज

अनेकांना हाताच्या पाचही बोटात अंगठी घालण्याचा छंद असतो. अंगठी प्रेमींकडे विविध अंगठ्यांचा कलेक्शन सापडते. अंगठी घातल्यावर बोटं फॅशनेबल दिसतात. अंगठीमुळे बोटांची शोभा वाढते. त्यामुळे काहींना बोटात अंगठी घालण्याचा मोह आवरत नाही. अंगठी खरेदी करताना आपण विचार न करता बोटात अंगठी घालतो, मग ती फसण्याची शक्यता देखील वाढते.

काही वेळेला बोटं सुजल्यानंतरही अंगठी अडकते. ज्यामुळे बोटांमधील ब्लड सर्क्युलेशन बिघडते. बोटात अंगठी अडकण्याची कारणे अनेक असू शकतात, पण ती काढण्यासाठी हे काही उपाय करून पाहा. या उपायांमुळे बोटांमधून अंगठी सहज निघेल. व तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची देखील गरज भासणार नाही(How to Get a Ring Off: 3 Easy Steps).

रिबीनच्या मदतीने काढा अंगठी

सध्या एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्यात अडकलेली अंगठी एका सिल्क रिबीनच्या मदतीने सहज काढण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने अंगठीच्या आत रिबीन टाकले, व बोटांना हे रिबीन गुंडाळले. व त्यानंतर हळूच रिबीन खेचून, त्यांनी अंगठी सहजरित्या ओढून काढली. ही ट्रिक आपण देखील घरी ट्राय करू शकता.

घरात लावा ही ५ रोपं, तुमच्या घरात उन्हाळयात चुकूनही डास येणार नाहीत...

अंगठी काढण्यासाठी इतर उपाय

आपण अडकलेली अंगठी काही घरगुती उपायांनी देखील काढू शकता. यासाठी आपण साबण, पेट्रोलियम जेली,  हँड लोशन, तूप, हेअर कंडिशनर, शॅम्पू, अँटीबायोटिक मलम, कुकिंग स्प्रे अशा अनेक उपायांच्या मदतीने अंगठी काढू शकता. तूप, कुकिंग ऑइल, बेबी ऑइल यासारखे पदार्थ बोटातून काही वेळात अंगठी काढण्यास मदत करतील.

थंड पाण्याची घ्या मदत

उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात अंगठी बोटांमध्ये घट्ट बसते. बोटात अंगठी बसली असेल तर, एका मोठ्या बाऊलमध्ये थंड पाणी घ्या, त्यात बर्फ देखील टाकू शकता. त्यात आपला हात काही वेळेसाठी ठेवा. काही वेळेनंतर हात पाण्यातून बाहेर काढा. व अंगठीला फिरवून हळू - हळू काढण्याचा प्रयत्न करा. त्यात आपण डिश वॉशर मिक्स करू शकता.

मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक

अंगठी काढल्यानंतर उपाय

अंगठी काढल्यानंतर बोटं पाणी व साबणाने धुवा. व त्यानंतर लगेच अंगठी घालू नका. एका आठवड्यानंतर सैल अंगठी घाला. बोटांना काही वेळेसाठी आराम द्या.

Web Title: How to Get a Ring Off: 3 Easy Steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.