Lokmat Sakhi >Social Viral > वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? एक सोपा उपाय, कपडे निघतील चकाचक

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? एक सोपा उपाय, कपडे निघतील चकाचक

How to Get Detergent "Stains" Out of Clothes : कपड्यांवर डिटर्जंटचे पांढरे डाग तसेच राहत असतील तर, कपडे धुताना एक गोष्ट लक्षात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 10:40 AM2023-10-11T10:40:50+5:302023-10-11T10:45:02+5:30

How to Get Detergent "Stains" Out of Clothes : कपड्यांवर डिटर्जंटचे पांढरे डाग तसेच राहत असतील तर, कपडे धुताना एक गोष्ट लक्षात ठेवा

How to Get Detergent "Stains" Out of Clothes | वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? एक सोपा उपाय, कपडे निघतील चकाचक

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? एक सोपा उपाय, कपडे निघतील चकाचक

काही लोकं हाताने कपडे धुतात, तर काही जण वॉशिंग मशीनचा वापर करतात. कपडे धुण्यासाठी कपडे धुण्याचा साबण आणि डिटर्जंटचा वापर केला जातो. आजकाल वेळेच्या अभावामुळे लोकं वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतात. त्यात कपडे कमी वेळात, मेहनत न घेता धुतले जातात. पण त्यातील एक समस्या म्हणजे कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे पांढरे डाग तसेच राहतात.

आपण देखील कपड्यांवर डिटर्जंटचे पांढरे डाग पाहिले असतील. ज्यामुळे चारचौघात लाजिरवाणे वाटू शकते. जर वॉशिंग मशीनमध्ये धुतलेल्या कपड्यांवर पांढरे डाग तसेच राहत असतील तर, काही सोप्या टिप्स फॉलो करून पाहा. या उपायांमुळे वॉशिंग मशीनमध्ये कपडे स्वच्छ धुतल्या जातील(How to Get Detergent "Stains" Out of Clothes).

या कारणामुळे कपड्यांवर डिटर्जंटचे डाग राहतात

कपडे धुताना आवश्यकतेपेक्षा जास्त डिटर्जंट, व कमी पाण्याचा वापर केल्यास त्यावर पांढरे डाग तसेच राहतात. यामुळे मशीनमध्ये कपडे धुताना डिटर्जंट कमी पण पाण्याचा वापर जास्त करावा. अनेकदा पावडर डिटर्जंटमुळे कपड्यांवर डाग तसेच राहतात.

झोप कमी झाली की वजन वाढतं हे खरं की खोटं? वजन वाढत असेल तर झोपा काढा..

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना कोणती काळजी घ्याल

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग टाळण्यासाठी, मशीनची सेटिंग्ज योग्य ठेवा आणि कपडे धुताना ओव्हरलोड करू नका. याशिवाय, योग्य प्रमाणात डिटर्जंटचा वापर करा.

फक्त २० मिनिटं रोज चालायची तयारी आहे? पोट कमी करण्याची आणि फिटनेस वाढवण्याची सोपी युक्ती

कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग कसे काढायचे?

व्हिनेगरचा वापर करून आपण कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग काढू शकता. यासाठी कोमट पाण्यात एक कप व्हिनेगर चांगले मिसळा आणि त्यात कपडे १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. यानंतर हलक्या हाताने कपडे चोळून धुवून घ्या. शेवटी स्वच्छ पाण्याने कपडे धुवा. आपण कपड्यांवर पावडर डिटर्जंटच्याऐवजी लिक्विड डिटर्जंटचा देखील वापर करू शकता. यामुळे कपड्यांवर डिटर्जंटचे पांढरे डाग राहणार नाही.

Web Title: How to Get Detergent "Stains" Out of Clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.