Lokmat Sakhi >Social Viral > जीन्सवर पडलेत चिखलाचे डाग ? ४ सोपे उपाय, आता पावसाळ्यातही जीन्स घाला बिनधास्त !

जीन्सवर पडलेत चिखलाचे डाग ? ४ सोपे उपाय, आता पावसाळ्यातही जीन्स घाला बिनधास्त !

How to Remove Mud Stains From Jeans : पावसाळ्यात जीन्सवर चिखलाचे डाग पडून ती खराब होईल या भीतीने आपण जीन्स घालत नाही, परंतु काही सोपे उपाय वापरून हे हट्टी डाग काढता येऊ शकतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 03:37 PM2024-07-05T15:37:01+5:302024-07-05T15:54:28+5:30

How to Remove Mud Stains From Jeans : पावसाळ्यात जीन्सवर चिखलाचे डाग पडून ती खराब होईल या भीतीने आपण जीन्स घालत नाही, परंतु काही सोपे उपाय वापरून हे हट्टी डाग काढता येऊ शकतात...

How To Get Dirt Stains Out Of Jeans How to Remove Mud Stains From Jeans | जीन्सवर पडलेत चिखलाचे डाग ? ४ सोपे उपाय, आता पावसाळ्यातही जीन्स घाला बिनधास्त !

जीन्सवर पडलेत चिखलाचे डाग ? ४ सोपे उपाय, आता पावसाळ्यातही जीन्स घाला बिनधास्त !

पावसाळ्यात पावसाचा आनंद तर आपण घेतोच, पण त्यासोबतच अनेक समस्यांचा देखील सामना करावा लागतो. पावसाळ्यात पाणी साचून सगळीकडे ओलावा आणि चिखल होतो. बरेचदा पावसाळ्यात (How To Get Rid Of Mud Stains) रस्त्यांवर भरपूर चिखल होतो. अशा चिखलातून चालणे नकोसे वाटते. पावसाळ्यात बरेचदा आपले कपडे खराब होतात. म्हणून आपण पावसाळ्यात नवीन कपडे घालणे टाळतो. पावसाळ्यात होणारा चिखल आपल्या कपड्यांना लागू नये याची काळजी आपण घेतो. या ऋतूत आपण शक्यतो पांढरे व जाड कपडे घालणे टाळतो. पांढऱ्या कपड्यांवर चिखल उडेल आणि जाड कपडे पावसाच्या ओल्या वातावरणामुळे लगेच सुकणार नाही, अशी भीती असते(How To Remove Mud Stains From Jeans).

जीन्स ही बऱ्यापैकी जाड कापडाची असते. पावसाळ्यात आपण शक्यतो जीन्स घालणे टाळतो. जीन्सवर उडालेले चिखलाचे डाग काढणे कठीण काम असते. याचबरोबर एकदा धुतलेली जीन्स वाळण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतात. पावसाळ्यात हमखास कितीही काळजी घेतली तरीही कपड्यांवर चिखलाचे डाग (Removing mud stains from jeans) पडतातच. अशावेळी आपण कितीही साबण किंवा डिटर्जंटने कपडे घासले तरीही हे डाग जात नाहीत. मग अशावेळी नक्की काय करायंच तर त्यावर काही सोपे उपाय आहेत. पावसाळ्यात जीन्सवर जर चिखलाचे डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(How to Remove Mud Stains From Jeans).

जीन्सवर जर चिखलाचे डाग पडले असतील तर... 

१. जीन्सवर जर चिखलाचे डाग पडले असतील तर असे डाग सहजासहजी जात नाहीत. जीन्सवरील चिखलाचे डाग काढण्यासाठी सर्वात आधी आपण टिश्यू पेपरचा वापर करु शकतो. जीन्सच्या ज्या भागावर चिखल लागला आहे त्या भागावर टिश्यू पेपर ठेवून हलकेच दाब द्यावा. यामुळे तो चिखल व त्यात असणारे धूलिकण लगेच टिश्यू पेपरवर चिकटतात. जीन्सला चिखल लागल्यावर लगेच आधी टिश्यू पेपरने काढून घेतल्यास फारसा डाग राहत नाही. हा प्राथमिक उपाय केल्याने जीन्सवर जरी चिखलाचे डाग पडले तरी ते नंतर काढणे सोपे जाते. 

२. जर चिखलाचे डाग जुने झाले असतील २ ते ३ दिवस पूर्वीचे डाग असतील, तर असे डाग निघता निघत नाहीत. अशावेळी सर्वप्रथम वाळलेला चिखल ब्रश किंवा चाकू च्या मदतीने खरडवून काढून घ्या. त्यानंतर जीन्सच्या ज्या भागांवर डाग लागला आहे तो भाग किमान अर्धा तास गरम पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर एका बादलीत पुन्हा गरम पाणी घेऊन त्यात डिटर्जंट घाला व त्यात ही जीन्स १० ते १५ मिनिटे भिजत ठेवून द्या. त्यानंतर जीन्स रगडून मग स्वच्छ पाण्याने धुवा. 

धुतलेली भांडी ठेवण्याची स्टीलची जाळी अस्वच्छ दिसते? १ भन्नाट ट्रिक, जाळी दिसेल नव्यासारखी चकचकीत...

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅक मधील घाण साफ करणे आता झाले सोपे, वापरा या २ ट्रिक्स... 

३. जीन्सवरील चिखलाचे हट्टी डाग काढण्यासाठी आपण स्पंजचा वापर करु शकतो. जीन्सवरील चिखलाचे हट्टी डाग काढण्यासाठी एका बाऊलमध्ये पाणी आणि डिटर्जंट सम प्रमाणांत घेऊन त्याचे द्रावण तयार करावे. आता यात लिंबाचा रस, बेकिंग सोडा घालून द्रावण मिसळून घ्यावे. जर डाग अधिक हट्टी असतील आणि निघत नसतील तर आपण व्हिनेगरचा देखील वापर करु शकता. या तयार केलेल्या द्रावणात स्पंज भिजवा आणि थेट डागांवर घासून घ्या. नंतर जीन्स स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. हा उपाय केल्याने चिखलाचे हट्टी डाग लगेच निघून जातील.

४. कच्च्या बटाट्याची पेस्ट करून ती चिखलाचे डाग असलेल्या भागावर लावावी. काहीवेळ ती पेस्ट तशीच ठेवून नंतर जीन्स धुवून घ्यावी. यामुळे चिखलाचे  डाग सहज निघून जाण्यास मदत होते. कच्चा बटाटा हा डाग घालवण्यासाठी उपयुक्त आहे. जीन्सवर चिखलाचा डाग लागला असेल तर तो पहिल्यांदा नीट स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर त्यावर कच्चा बटाटा घासा. थोड्या वेळाने जीन्स डिटर्जंट किंवा साबणाने धुवा. तुमच्या जीन्सला लागलेले चिखलाचे डाग  सहजपणे निघून जातील.

फोमच्या खुर्च्यांवरची धूळ काढून त्या स्वच्छ करण्याची नवीकोरी ट्रिक, खुर्च्या दिसतील पुन्हा नव्यासारख्या... 

Web Title: How To Get Dirt Stains Out Of Jeans How to Remove Mud Stains From Jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.