झोपण्याची उशी व चादर हे नेहमी स्वच्छ धुतलेले फ्रेशच असावे, असे आपल्याला वाटत असते. आपण शक्यतो झोपण्याच्या चादरी, बेडशीट्स, उशी कव्हर, उशी हे सगळे वेळोवेळी आपण धुवून स्वच्छ करतोच. परंतु आपण काहीवेळा आपल्या केसांना तेल लावून तेल मालिश करुन उशी घेऊन तसेच झोपी जातो. असे केल्याने उशीची स्वच्छ धुतलेली कव्हर्स खराब होतात. तेलाचे डाग हे किती हट्टी व जिद्दी असतात हे सगळ्यांनाच (How to Get Hair Oil Stains Out of Pillowcases) माहित असते. असे तेलाचे हट्टी डाग उशीच्या कव्हर्स वरून निघता निघत नाहीत. त्यात उशीचे कव्हर जर पांढरेशुभ्र असेल तर विचारच करु नका की, ते किती घाण होईल.
अनेकदा असे घडते जेव्हा आपण रात्री तेल लावून झोपायला जातो किंवा दुपारी सोफ्यावर बसतो तेव्हा आपल्या केसांमधील तेल उशी किंवा कुशन कव्हरमध्ये शोषले जाते. सुरुवातीला हे तेलाचे डाग उशीवर दिसत नाहीत, पण दोन - चार दिवसांनी सतत तीच उशी वापरून या उशीवरचे डाग इतके घाण दिसून लागतात की ती उशी वापरणे नको वाटते. उशीच्या कव्हरवर लागलेल्या तेलामुळे आजूबाजूची धूळ सहजपणे कव्हरवर चिकटते, ज्यामुळे कव्हर काळे - पिवळे दिसू लागते. उशीवरचे हे काळे - पिवळे डाग कितीही घासून स्वच्छ केले तरीही ते हट्टी डाग जात नाहीत व उशीचे कव्हर अधिक घाण दिसते. असे होऊ नये म्हणून उशीवरचे तेलाचे हट्टी डाग सहजपणे काढून टाकण्यासाठी काही सोपे उपाय पाहूयात(How to Get Hair Oil Stains Out of Pillowcases).
उशीचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड डिटर्जंट
२. कास्टिक सोडा
३. गरम पाणी
४. व्हिनेगर
हॉटेलात घालतात तशी ताठ-एकही सुरकुती नसलेली बेडशीट घरच्या बेडवर कशी घालायची ? ५ टिप्स...
तेलकट उशीचे कव्हर नेमके कसे स्वच्छ करावे ?
१. एका मोठ्या बकेटमध्ये गरम पाणी घेऊन त्यात व्हिनेगर व डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड डिटर्जंट घालून ते पाण्यांत संपूर्णपणे विरघळवून त्याचे द्रावण बनवून घ्यावे.
२. आता या द्रावणांत तेलकट उशीचे कव्हर किमान १ ते २ तास भिजत ठेवावे.
३. या तयार केलेल्या द्रावणांत उशीचे कव्हर २ ते ३ तास भिजवून ठेवल्यांनंतर ते बाहेर काढून परत दुसऱ्या एका द्रावणांत बुडवून ठेवावे.
४. दुसऱ्या प्रकारचे द्रावण तयार करण्यासाठी एका मोठ्या बकेटमध्ये गरम पाणी घेऊन त्यात डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड डिटर्जंट घालून त्यानंतर कास्टिक सोडा घालावा.
५. कास्टिक सोडा व डिटर्जंट पावडर यांच्या तयार करून घेतलेल्या द्रावणांत हे उशीचे कव्हर २ ते ३ तास किंवा संपूर्ण रात्रभर भिजत ठेवावे.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...
वॉश बेसिनवरचे पिवळे हट्टी डाग निघत नाहीत ? ३ सोपे उपाय, बेसिन चमकेल दिसेल स्वच्छ...
६. दुसऱ्या दिवशी या द्रावणांतून उशीचे कव्हर काढून डिटर्जंट पावडर किंवा साबणाच्या मदतीने पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावे.
७. त्यानंतर हे उशी कव्हर २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्यांतून घ्यावेत.
८. आपण हे उशी कव्हर वॉशिंग मशीनमध्ये डिटर्जंट घालून देखील धुवू शकता.
अशा रीतीने तेलकट झालेल्या उशी कव्हरवरील तेलाचे हट्टी डाग आपण अतिशय सहजरित्या काढू शकता.