कपड्यांवरील हट्टी डाग (Stain Removal) काढणे म्हणजे अवघड काम. अनेक प्रयत्न करुनही हे डाग निघण्याचे नाव घेत नाहीत. अशा वेळी महिलाही मेटाकुटीस येत असतात (Cleaning Tips). अनेक महागडे डिटर्जंट पावडर वापरुनही हे हट्टी डाग निघत नहीत. त्यात, पेनाची शाई, तेलकट - तुपकट डाग मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ठरत असतात. कपड्यांवरील डाग काढण्यासाठी आपण बरेच असतो. पण प्रत्येक उपाय फॉल ठरतो.
जर तुम्हाला तुमच्या आवडत्या कपड्यांवरील डाग हटवायचे असतील तर, आपण काही घरगुती उपायांची देखील मदत घेऊ शकता. रसायनयुक्त उत्पादनांचा वापर न करता, सोपे घरगुती उपाय करून मिनिटात डाग गायब होतील. हे उपाय पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठीही हे फायदेशीर ठरते(How to Get Ink Out of Clothes- Stain Removal Guide).
तेलाचा एक थेंबही न वापरता करा ८ प्रकारचे सूप, थंडीत रोज प्या गरमागरम सूप-वजन करा कमी!
बेकिंग सोडा
डाग पडलेला कपडा आधी थंड पाण्याने धुवून ओला करावा. ३ चमचे बेकिंग सोडा साध्या पाण्यात मिसळा आणि पेस्ट तयार करा. तयार पेस्ट डागांवर लावा. ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर त्यावर लाँड्री डिटर्जंट लावा. काही वेळ तसेच राहू द्या. नंतर हाताने कपडे धुवून घ्या.
वाटीभर मेथी दाण्यांचे करा पौष्टीक लाडू, कडू अजिबात होणार नाही; हिवाळ्यात दुखण्यांपासून राहाल लांब
लिंबाचा रस
लिंबाचा रस फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून, कपड्यांवरील हट्टी डाग काढण्यासही उपयुक्त ठरते. यासाठी एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि मीठ समान प्रमाणात मिसळा. तयार पेस्ट डागांवर लावा. यानंतर १-२ तास तसेच ठेवा. दर २० - २५ मिनिटांनी तपासात राहा. जेणेकरून लिंबूमुळे कापड खराब होणार नाही. त्यानंतर ते धुवा.
व्हिनेगर
व्हिनेगर हा एक डाग दूर करणारा प्रभावी उपाय आहे. कपड्यातील दुर्गंधी आणि डाग दूर करण्यासाठी आपण याचा वापर करू शकता. यासाठी डागांवर थेट व्हिनेगर टाका. काही वेळ तसेच राहू द्या. नंतर कापड धुवून घ्या.