Join us  

कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? ३ भन्नाट उपाय; कपडे दिसतील नवे-चकाचक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 10:10 AM

How to Get Laundry Detergent Stains Out of Clothes : कपड्यांवर डिटर्जंटचे पांढरे डाग तसेच राहत असतील तर; धुतल्यानंतर ३ गोष्टींचा वापर करा..

धावपळीच्या जीवनात बरेच जण कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतात. तर काही जण हातानेच कपडे धुतात. कपडे धुण्यासाठी कपडे धुण्याचा साबण आणि डिटर्जंटचा वापर होतो. वेळेच्या अभावामुळे काही लोकं वॉशिंग मशीनमध्ये डिटर्जंट आणि कपडे घालून मोकळे होतात. मेहनत न घेता, मशीन कपडे धुवून काढते. पण बऱ्याचदा कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे पांढरे डाग तसेच राहतात (Cleaning Tips).

आपण देखील कपड्यांवर डिटर्जंटचे पांढरे डाग पाहिले असतील. ज्यामुळे चारचौघात लाजिरवाणे वाटू शकते. वॉशिंग मशीन (Washing Machine) असो किंवा हाताने कपडे धुतल्यानंतर जर कपड्यांवर तसेच डिटर्जंटचे डाग राहत असतील तर, काही घरगुती उपायांना फॉलो करून पाहा. कपडे चकाचक स्वच्छ निघतील(How to Get Laundry Detergent Stains Out of Clothes).

व्हिनेगर

व्हिनेगर एक उत्कृष्ट नैसर्गिक क्लिनिंग एजंट आहे, जे डिटर्जंटचे डाग काढून टाकण्यास प्रभावी ठरते. यासाठी अर्धा कप पांढरा व्हिनेगर एक बादली कोमट पाण्यात मिसळा. नंतर या पाण्यात डिटर्जंटचे डाग लागलेले कापड ३० मिनिटांसाठी भिजत ठेवा. यानंतर हलक्या हातांनी घासून स्वच्छ पाण्याने धुवा.

कपड्यांवरुन लोक तुमच्यावर शिक्के मारणार असतील तर..! रकुल प्रीत सिंग म्हणते, विचार केला तर..

बेकिंग सोडा पेस्ट

बेकिंग सोडा फक्त जेवणासाठी नसून, कपड्यांवरचे डाग दूर करण्यासाठीही प्रभावी ठरते. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात बेकिंग सोडा मिसळून घट्टसर पेस्ट तयार करा. तयार पेस्ट डागांवर लावा. २० मिनिटानंतर ब्रशने हलके चोळून कापड पाण्याने धुवा.

पिवळे दात राहतील कायम पांढरेशुभ्र, बाल्कनीत कुंडीत लावा ३ रोपं, करा साेपा उपाय

लिंबाचा रस

लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. जर आपल्याला संपूर्ण कापड धुवायचे नसेल तर, लिंबाच्या रसात कॉटन बॉल बुडवून डागांवर चोळा. १५ मिनिटानंतर कापडाचा तो भाग पाण्याने धुवा. परंतु, रेशीम किंवा सुती कपड्यांवर लिंबाच्या रसाचा वापर करू नये. कारण लिंबाच्या रसामुळे हे कापड खराब किंवा त्याचे रंग उडू शकते. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल