Lokmat Sakhi >Social Viral > माझेच इन्स्टाग्राम फॉलोअर्स का वाढत नाहीत असा प्रश्न पडलाय? ३ टिप्स, पाहा व्हायरलची खास गोष्ट

माझेच इन्स्टाग्राम फॉलोअर्स का वाढत नाहीत असा प्रश्न पडलाय? ३ टिप्स, पाहा व्हायरलची खास गोष्ट

How To Get More Followers on Instagram : इन्स्टाग्राम रिल्स-पोस्ट अनेकजण करतात पण फॉलोअर्सचं गणित जमण्याचं प्रकरण वेगळं असतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 05:45 PM2023-11-10T17:45:25+5:302023-11-10T17:46:38+5:30

How To Get More Followers on Instagram : इन्स्टाग्राम रिल्स-पोस्ट अनेकजण करतात पण फॉलोअर्सचं गणित जमण्याचं प्रकरण वेगळं असतं..

How To Get More Followers on Instagram | माझेच इन्स्टाग्राम फॉलोअर्स का वाढत नाहीत असा प्रश्न पडलाय? ३ टिप्स, पाहा व्हायरलची खास गोष्ट

माझेच इन्स्टाग्राम फॉलोअर्स का वाढत नाहीत असा प्रश्न पडलाय? ३ टिप्स, पाहा व्हायरलची खास गोष्ट

गेल्या काही वर्षात तरुणाईंमध्ये फेसबुक (Facebook) कमी पण इन्स्टाग्रामची (Instagram) क्रेझ वाढत चालली आहे. इन्स्टाग्राम हे फक्त फोटो शेअरिंग अ‍ॅप राहीलेले नसून, त्याचा वापर रील्स तयार करण्यात आणि बघण्यासाठी जास्त होतो. ज्यामुळे फॉलोअर्स (Followers) तर वाढतातच, शिवाय व्ह्यूस आणि फॉलोअर्सवरून वापरकर्त्यांना त्याचा फायदा जास्त होतो. दर महिन्याला २ बिलियनहून अधिक युजर्स इन्स्टाग्रामचा वापर करतात.

सध्या इन्स्टाग्राम हे कमाईचे मोठे माध्यम बनले आहे. पण हे फॉलोअर्स काही दिवसात वाढत नाही. फॉलोअर्स वाढण्यासाठी आपले कण्टेट, व्हिडिओ आणि रोज अपडेट राहणं गरजेचं आहे. अशा वेळी फॉलोअर्स वाढवण्यासाठी काय करावे? फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोणत्या ट्रिक उपयोगी पडतील? पाहूयात(How To Get More Followers on Instagram).

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी सोप्या टिप्स

उत्तम कॅप्शनचा वापर करा

पोस्ट केल्यानंतर बरेच जण पोस्टखाली कॅप्शन लिहितात. कॅप्शनमुळे फॉलोअर्स पोस्टकडे आकर्षित होतात. कॅप्शनद्वारे युजर्स पोस्टमध्ये काय असेल याचा अंदाज लावतात. आपण कॅप्शनखाली टॅग्सचा देखील वापर करतो. ज्यामुळे आपली पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहचू शकते. आपण आपल्या पोस्टमध्ये मित्रांना किंवा इतरांना टॅग देखील करू शकतो. ज्यामुळे आपली पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचते. आपण इतरांच्या पोस्टवर कमेण्ट करून देखील इन्स्टाग्रामवर सक्रीय राहू शकता.

मेहेंदी डिझाईन काढायला जमत नाही? हातावर १ ते १० आकडे लिहा, मग भोवतीने सोपी डिझाईन काढा, पाहा मेहेंदी काढायची सोपी ट्रिक

प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे

अनेकदा आपण आपल्या अकाऊंटवर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करतो. त्या पोस्टवर बरेच जण कमेण्ट करतात. त्या कमेण्टवर रिप्लाय देऊन आपण आपल्या फॉलोअर्ससोबत कनेक्टेड राहू शकता. ऑडियन्सला एंगेज ठेवणं गरजेचं आहे. कारण सध्या बरेच जण  कमेण्टद्वारे व्हायरल होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसोबत कनेक्टेड राहा. शिवाय इतरांपेक्षा हटके कण्टेट देत राहा.

लेकीच्या लग्नापर्यंत व्हायचं होतं झटपट बारीक, 'ओझेम्पिक' औषधामुळे मुकावे लागले प्राण, वेट लॉस औषधामुळे कसा गेला जीव? पाहा...

नियमितपणे फोटो, व्हिडिओ अपलोड करा

आपण जर आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा किंवा दोनदा व्हिडिओ, फोटो अपलोड करत असाल तर, असं करू नका. ही सवय त्वरित बदला. जर आपल्याला इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवायचे असतील तर, नियमित फोटो, व्हिडिओ किंवा रील्स अपलोड करत राहा. यामुळे आपण डेली बेसिसवर लोकांना अपडेट देत आहात हे कळून येईल. 

Web Title: How To Get More Followers on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.